Navi Mumbai Crime News : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाढत्या कार चोरीच्या अनुषंगानं त्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. त्यानुसार सानपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोहम्मद तौफिक हबीबुल्ला आणि त्याचा साथीदार मनोज गुप्ता याला दिनांक 9 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. 


कार चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक तपास केला असता, आरोपींनी चोरी केलेल्या कार या सुरत, कोलकाता, मुर्शीदाबाद, असनसोल तसेच झारखंड अशा ठिकाणी विकल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार कारवाई करून 1 कोटी 46 लाख 50 हजार रुपये किमतींच्या चारचाकी गाड्या नवी मुंबईच्या गुन्हे शाखा कक्ष 1 ने हस्तगत केल्या आहेत. 


इन्स्टाग्राम स्टार 'फैजू'ची भरधाव कार थेट सोसायटीत, अपघातानंतर फैजूला अटक, Instaवर अडीच कोटी फॉलोअर्स


क्राईम ब्रॅन्चनं मार्च 2021 ते जून 2021 या कालावधीत घडलेल्या कार चोरी गुन्ह्यांचा खोलवर तपास केला होता. अटक आरोपींनी चोरी केलेल्या कारचे मूळ इंजिन नंबर, चेसीस नंबर, डॅमेज करून त्यावर अपघातामध्ये पूर्ण नुकसान झालेल्या कारचे इंजिन तसेच चेसीस नंबर छापून सदर गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. सदर गुन्ह्यात आंतरराज्यीय कार चोरी करणारी टोळी सक्रिय असल्यानं सूरत, कोलकाता, मुर्शीदाबाद, असनसोल, तसेच झारखंड अशा विविध राज्यात विकल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार कारवाई करून सात आरोपींना अटक करून त्यांच्या जवळून 6 स्विफ्ट डिझायर, 2 इर्टीगा, 1 सुझुकी सियाज, 1 स्कॉर्पिओ, 1 मारुती रिट्झ या गाड्या हस्तगत केल्या आहेत.


दरम्यान, सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी तौफिक हबीबुल्ला यांच्यावर 27 विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तर मनिष देवसीभाई चोवटीया याच्यावर 44 गुन्हे दाखल आहे. अथक परिश्रम घेऊन अटक केलेल्या आरोपींकडून एकूण 18 कार हस्तगत केल्या आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :