एक्स्प्लोर

Navi Mumbai Crime : वायफायचा पासवर्ड शेअर न केल्याने 17 वर्षीय मुलाची हत्या, दोन सफाई कामगार अटकेत

Navi Mumbai Crime : वायफायचा पासवर्ड शेअर करण्यास नकार दिल्याने कामोठे येथील हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या दोन तरुणांनी 17 वर्षीय तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

Navi Mumbai Crime : नवी मुंबईच्या कामोठे (Kamothe) हाऊसिंग सोसायट्यांमध्ये सफाई कामगार म्हणून करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी 17 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे. आपल्या इंटरनेट वायफायचा (Wi-Fi) पासवर्ड शेअर करण्यास नकार देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन या दोन तरुणांनी 17 वर्षीय मुलाला जीवे मारलं. ही घटना कामोठे सेक्टर 14 मध्ये 27 ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली.

रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी अशी दोन्ही आरोपींची नावं असून ते सफाई कामगार म्हणून काम करतात तर मृत विशाल मौर्य हा बेकरीमध्ये काम करत होता. या प्रकरणी माहिती देताना कोमोठेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव म्हणाल्या की, "बेकरीमध्ये काम करणाऱ्या विशाल मौर्यच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे."

वायफायच्या पासवर्डवरुन वाद
रवींद्र अटवाल आणि राज वाल्मिकी यांनी पहिल्यांदा विशालला मारहाण केली आणि मग त्याच्या पाठीत चाकू भोसकला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी विशालला जवळच्या एमजीएम रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी सांगितलं. दोन्ही आरोपी मद्यधुंद अवस्थेत होते. दोघांचा वायफायच्या पासवर्डवरुन विशालसोबत वाद झाला होता. या प्रकरणात एक पान दुकानाचा मालक साक्षीदार आहे. त्याने दोन्ही आरोपींना पाहिलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात पान दुकान मालकाला तक्रारदार केलं आहे.

दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा
कामोठे पोलिसांनी दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. पनवेल कोर्टाने त्यांना 2 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव यांनी पुढे सांगितलं की, तक्रारदार पान दुकान मालकाने आपल्या जबाबात म्हटलं की, आपण रवींद्र आणि राज या दोन्ही आरोपींना ओळखतो, कारण हे दोघेही आपल्या दुकानात पान खाण्यासाठी आणि सिगरेट खरेदी करण्यासाठी येणारे नियमित ग्राहक आहेत.

घटनास्थळी नेमकं काय घडलं?
दुकान मालकाने पुढे सांगितलं की, मी 27 ऑक्टोबरला रात्री 11 वाजता दुकानातच होतो. यावेळई रवींद्र आणि राज माझ्या दुकानाजवळच एका अज्ञात तरुणासोबत वादावादी करत होते. पहिल्यांदा दोघांनी या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारलं मग राजने त्याच्या पाठीवर चाकून वार केला. हा मुलगा खाली कोसळताच दोघांनीही तिथून पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा मुलगा उठला आणि काही अंतर चालल्यावर  तिथेच पुन्हा कोसळला आणि बेशुद्ध झाला. काही स्थानिकांनी जखमी मुलाला कामोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात दाखल केलं, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Nagpur Accident Parinay Fuke Son: मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
मध्य प्रदेशातील अभयारण्यात अपघात, एकाने जीव गमावला; आमदार परिणय फुकेंच्या मुलाबाबत कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांचा खुलासा
Mumbai Crime News: माणुसकीला काळीमा! 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; किरीट सोमय्यांचा संताप, थेट पोलीस स्टेशन गाठलं, म्हणाले, 'मुंबईकरांवर लांच्छन...'
माणुसकीला काळीमा! कांदिवलीत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार; किरीट सोमय्यांचा संताप, थेट पोलीस स्टेशन गाठलं, म्हणाले, 'मुंबईकरांवर लांच्छन...'

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Mumbai Police : मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
मुंबई पोलीस दलातील जवानानं जीवन संपवलं, पोलिसानं टोकाचं पाऊल का उचललं? कारण समोर
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
Embed widget