एक्स्प्लोर

Pune Nasrapur Bhor Crime: ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?

Pune Nasrapur Bhor Crime: नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

Pune Nasrapur Bhor Crime: पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून (Pune Nasrapur Bhor Crime) संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणानंतर सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आरोपीला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. मात्र, आरोपीने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुराने नसल्यानं तो 2 वेळा निर्दोष सुटला आहे. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. 

नसरापूरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असताना, या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर येत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. आरोपीचा मुलगा म्हणाला की, मला बाप म्हणून त्याला स्वीकारण्याची लाज वाटते. माझी एकच चूक आहे की मी त्याच्या पोटी जन्मलो. सरकारने त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी. त्याला ठेचून मारायला हवं. त्याने केलेला गुन्हा माफ करण्यासारखा नाही. त्या निष्पाप मुलीला न्याय मिळाला पाहिजे, पीडित मुलगी माझ्या भाची सारखी होती, असंही आरोपीच्या मुलाने सांगितले. (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपीची पत्नी काय म्हणाली? (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपीला जिवंत जाळा...उभं जाळा...मला त्याचं तोंडही पाहायचं नाही. त्याचा अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला पण येऊ नका...फाशीची शिक्षा त्याच्यासाठी किरकोळ आहे, त्याला जिवंत जाळलं पाहिजे, असं आरोपीच्या पत्नी म्हणाल्या. मला अकरा नातवंडं आहेत. त्या निष्पाप बाळाच्या आत्म्याला काय वाटलं असेल? तिच्या आईच्या काळजाचा तुकडा गेला, तिला काय वाटत असेल याची मी कल्पना करू शकते. मी सुद्धा कुणाची तरी आईच आहे. घटना घडल्यापासून माझ्या घशाखाली अन्नाचा घास उतरलेला नाही, असंही आरोपीच्या पत्नी म्हणाल्या. 

गेल्या 10 वर्षांपासून आरोपीसोबत आमचा संबंध नाही- (Pune Nasrapur Bhor Crime)

आरोपी पतीसोबत आमचा गेल्या 10 वर्षांपासून कोणताही संबंध नाही. मी आणि माझा मुलगा दोघेच एकत्र राहतो. या 10 वर्षांत आम्ही अनेकदा त्याला घरी बोलावण्याचा, नीट वागण्याचा प्रयत्न केला. पण तो नेहमी 'तुझं तू बघ' असं म्हणून आम्हाला झिडकारायचा, अशी प्रतिक्रियाही आरोपीच्या पत्नीने दिली. 

नेमकं काय घडलं? (Pune Nasrapur Bhor Crime)

सुट्टीसाठी आजीच्या घरी आलेली 4 वर्षांची चिमुकली अंगणात खेळत होती. त्यावेळी 1 मे रोजी 65 वर्षांच्या आरोपीने तिला गोठ्यात नेलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एवढंच नाहीतर तिला दगडाने ठेचून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेऊन पळ काढला. इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. 

नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?, VIDEO:

 

संबंधित बातमी:

Eknath Shinde On Pune Nasrapur Bhor Crime: पुण्यातील भोर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांना एकनाथ शिंदेंचा फोन; वडील एकच वाक्य म्हणाले, जसं योगी सरकार...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Pune Crime News: नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
नसरापूरची पुनरावृत्ती; पुण्यातील जुन्नरमध्ये अल्पवयीन मुलीसोबत अत्याचार, नंतर निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं
लग्नात 12 लाख रुपयांसह 11 तोळं सोनं दिलं, तरीही पतीच्या नोकरीसाठी पाच लाखांचा तगादा, विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल, धक्कादायक घटनेनं बीड हादरलं

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget