एक्स्प्लोर

Nashik Road Jail: नाशिकच्या कारागृहात नेमकं चाललंय काय? कैदी अंमली पदार्थ सेवन करतानाचे फोटो, व्हिडीओ व्हायरल; प्रशासनात खळबळ

Nashik Road Jail: कैद्यांनी कारागृहाच्या आत अमली पदार्थांचे सेवन केल्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Nashik Road Jail: नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृह (Nashik Road Central Jail) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कैद्यांनी कारागृहाच्या आत अमली पदार्थांचे सेवन करतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे, याच व्हायरल व्हिडीओंमध्ये काही कैद्यांनी मोबाईलवर रील्स देखील बनवल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेवर आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Nashik Road Jail: जुने व्हिडीओ की नव्याने घडलेली घटना?

सध्या हे फोटो आणि व्हिडीओ नेमके कोणत्या कालखंडातील आहेत, आणि खरोखरच नाशिकरोड कारागृहातीलच आहेत का? याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाने हे जुने व्हिडीओ असल्याचा दावा केला आहे. "गेल्या काही वर्षांपासून कैद्यांसाठी सकारात्मक उपक्रम राबवले जात आहेत. हे पाहून काही आत्मसंतुष्ट व्यक्तींनी जुन्या क्लिप्स मुद्दाम व्हायरल केल्या आहेत," असे कारागृह अधीक्षकांनी म्हटले आहे. 

Nashik Road Jail: यापूर्वीही सुरक्षेचा भंग

नाशिकरोड कारागृहात यापूर्वीही मोबाईल वापराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

24 नोव्हेंबर 2016: 7 मोबाईल सापडले

23 डिसेंबर 2016: 8 मोबाईल जप्त

26 डिसेंबर: 3 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

27 डिसेंबर: तपासणीदरम्यान मोबाईल सापडल्याचे अधिकृत नोंद

या घटनांमुळे सुरक्षेच्या पातळीवर मोठी त्रुटी असल्याचे अधोरेखित झाले होते. त्यावेळी संशयित कैद्यांना इतर कारागृहात हलवण्यात आले होते.

Nashik Road Jail: कारागृहात अमली पदार्थ कसे पोहोचतात?

काही कैदी सुटीवरून परतताना तंबाखू, ड्रग्ज प्लास्टिकमध्ये लपवून आत घेऊन येतात. मातीच्या चिलीमचा वापर करून हे पदार्थ सेवन केले जातात. इतकेच नव्हे तर चार्जिंगसाठी मोबाईल कसा वापरला जातो, त्यामागे कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का? हेही तपासले जात आहे. यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेजची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. 

Nashik Road Jail: कैद्याचा शिपायावर हल्ला

या सर्व प्रकारांच्या पार्श्वभूमीवर, मंगळवारी संध्याकाळी कारागृहात आणखी एक धक्कादायक घटना घडली. बंदीवान बिलाल अली हुसेन शेख याने कारागृहातील शिपाई भाईदास भोई यांच्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा Video

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Digital Arrest: सरन्यायाधीश भूषण गवईंच्या कोर्टात हजर करण्याची धमकी, डिजिटल अरेस्ट करत एकाला 72 लाख तर दुसऱ्याला 6 कोटीचा गंडा; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

Nashik Crime Prakash Londhe: विदेशी दारूच्या बाटल्या, कुऱ्हाड, चाकू....; लोंढेच्या 'गुप्त भुयारा'तून नाशिक पोलिसांना काय-काय सापडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Cockroach Janta Party: गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
गुजरातवरुन आलेल्या दोन तरुणांचा अभिजीत दिपकेंच्या घराबाहेर थयथयाट, म्हणाले, 'आम्हाला दुसरा अरविंद केजरीवाल नकोय...'
Beed Jail Walmik Karad: बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
बीड कारागृहात वाल्मिक कराडला आठवड्यातून तीनवेळा फोनकॉलची सुविधा, कँटिनमध्ये 10 हजाराच्या खर्चाची मुभा, कारागृह अधीक्षकांची स्पष्टोक्ती
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shakib Al Hasan: बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
बांगलादेशचा माजी कॅप्टन शाकिब अल हसनच्या घरावर हल्ला, दगड आणि पेट्रोल बॉम्ब सुद्धा फेकले; हल्ला का केला, नेमकं काय घडलं?
Riya Ahir on Trolling harrasment: '140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
'140 रुपयांमध्ये मी देहविक्री....'; मुंबई पोलिसांची व्हॅन रोखणारी रिया अहिरचा रोष कुणावर? ट्रोलिंगवर म्हणाली...
Mumbai High Court on Doctor Strike: 'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
'काम बंद केलंत ना, मग पगार घेणंही बंद करा..' डॉक्टरांचा संप तातडीने मागे घेण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Devendra Fadnavis and Manoj jarange: मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्र रद्द होताच मनोज जरांगे भडकले, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Embed widget