नाशिकमध्ये लव्ह जिहादची धक्कादायक घटना, तरुणीला फूस लाऊन शारिरीक संबंध ठेवले, गर्भवती झाल्यावर कळलं...
लव्ह जिहादच्या दोन खळबळजनक घटना नाशिकमध्ये; सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nashik: नाशिकमध्ये 'लव्ह जिहाद’चे दोन खळबळजनक प्रकार उघडकीस आले असून, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये पीडित महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम युवक आहेत. या दोघांनी आपली खरी ओळख लपवून पीडित महिलांशी संबंध ठेवत लग्न आणि नोकरीच्या आमिषाने त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
या दोन्ही घटनांबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, पीडित महिलांनी तक्रारी दिल्यानंतर तपास सुरू आहे. आरोपींची ओळख लपवून लिव्ह-इनमध्ये राहत महिलांवर दबाव टाकण्यात आला. दोन्ही प्रकरणात पीडित महिलांना अपत्य असून, आरोपींकडून त्यांच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकण्यात आला.
नाशिकच्या सतपुरात लव्ह जिहादचा प्रकार
सातपूरमध्ये घडलेल्या घटनेत आरोपी मोहम्मद उजैर आलम (वय 37) याने स्वत:चं नाव ‘राजू’ असं सांगत 2013 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. त्यानंतर तिला नाशिकला आणून श्रमिकनगर भागात लिव्ह-इनमध्ये ठेवले. आपण अनाथ असून धर्म माहिती नाही, असं सांगत त्याने तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. 2016 मध्ये तरुणी गर्भवती राहिल्यानंतर त्याची खरी ओळख उघड झाली.तो मुस्लिम असल्याचे व त्याला भाऊ, आई असल्याचे समजले. युवकाच्या धर्माची ओळख पटल्यानंतर त्याने युवतीला हिंदू धर्माप्रमाणे घरात पूजा करण्यास विरोध केला. तसेच बाहेर जाताना बुरखा घालण्यास सांगून युवतीला मारझोड करून घरातून काढून देण्याची धमकी द्यायचा. दरम्यान, हिंदू मुलीवर मुस्लिम युवकाकडून अन्याय अत्याचार केला जात असल्याची माहिती परिसरातील युवकांना समजल्यानंतर त्यांनी युवतीला धीर देत सातपूर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी युवतीच्या फिर्यादीवरून मुस्लिम युवकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
अंबडमध्ये सासरच्या लोकांनी धर्मांतरासाठी जबरदस्ती
दुसऱ्या घटनेत, धर्मांतर कर, नाही तर तुझ्यासह मुलांना जीवे मारेल, असे धमकावत पतीने पत्नीचा छळ केला. तसेच आई-वडिलांची प्रॉपर्टी नावावर करण्याचा तगादा लावून कुटुंबियांना ठार मारण्याची धमकीही दिल्याची तक्रार विवाहितेने दिली. पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने चांगली वागणूक देत असल्याचे भासवून तिच्याशी लग्न केले. त्यानंतर संशयित पती व तिच्या सासरच्या व्यक्तींनी विवाहितेच्या वडिलांकडून वेळोवेळी असे एकूण 6 लाख रुपये घेतले. पतीने विवाहितेस दुसऱ्या वेळी गरोदर असताना मारहाण करून जमिनीवर पाडले व गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, तसेच देवदेवतांचा अवमान करून घरातील फोटो बाहेर फेकले. 3 जून 2025 या कालावधीदरम्यान संशयिताने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिच्याकडील पैसेही उकळल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर आणि अंबडमध्ये एक एक असे दोन गुन्हे दाखल
- काही महिलांसोबत लिव्ह इनमध्ये राहत होते. त्यांना काही अपत्य झाले.
- धर्मांतर करण्याचा प्रयत्न होता, बळजबरीने शरीर संबंध झाले.
- दोन्ही प्रकरणात अपत्य आहे, धर्म परिवर्तन करण्यासाठी जबरदस्ती
- मुलांचेही धर्मांतर करण्यासाठी जबरदस्त, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
- अंबडमध्ये छळ, जीवे मारणे, जबरदस्त शरीरसंबंध
- फिर्यादींनी तक्रार सांगितली त्यानुसार तपास केला जाईल
- फिर्यादी हिंदू, आरोपी मुस्लिम आहे, अनेक वर्षांपासून एकत्र राहत होते
हेही वाचा:























