नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील दिंडोरी रोडवरील आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) जवळ एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक-दिंडोरी-वणीरोडवर (Nashik Dindori Road) एका गोणीत संशयास्पद महिलेचा मृतदेह (Body Found) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह तीन दिवसांपूर्वीच असल्याचे ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. मात्र हा खून आहे की आणखी काही याबाबतची माहिती उत्तरीय तपासणीनंतर समोर येईल, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. 


नाशिक शहरात (Nashik City) गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांना कुठेतरी आळा बसल्याचे चित्र होते. अशातच म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या (Mhasrul Police Station)  हद्दीत महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. सदर महिलेचा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वीचा असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आला आहे. घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाचोरकर यांच्यासह फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली. दरम्यान पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिंडोरी रोड परिसरातून पायी जात असलेल्या काही नागरिकांना वास येत असल्याचे जाणवले. त्यांनी तात्काळ याबाबत म्हसरूळ पोलिसांना माहिती दिली. म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता महिलेचा मृतदेह एका गोणीत आढळून आला. त्यानुसार त्यांनी वरिष्ठाना याबाबत माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी पोहचले. सद्यस्थितीत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवला आहे. मात्र महिलेबाबत काही माहिती मिळू शकलेली नाही. महिलेचा मृतदेह कुजण्याच्या स्थितीत असल्याने नेमकी ओळख पटू शकलेली नाही. उत्तरीय तपासणीनंतर इतर माहिती समोर येईल. त्याचबरोबर ही महिला कोण आहे? हा खून आहे कि आणखी काही याबाबतची माहिती उत्तरीय तपासणीतून पुढे येण्याची शक्यता आहे. 


तपासानंतर सत्य समोर येईल.. 


दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू पाचोरकर म्हणाले की, या परिसरात तीन दिवसांपूर्वी मृतदेह आणून टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. कांदे भरण्याच्या जाळीदार गोणीत सदर मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. तसेच मी,मृतदेहाच्या आजूबाजूला काही कपडेही मिळून आले आहेत. मृतदेह तीन दिवसांपूर्वीचा असल्याचे मृतदेहावर अळ्या पडण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे प्रथमदर्शी महिलेची ओळख पटविणे आव्हान असणार आहे. त्यानुसार पोलिसांनी तपस करण्यास सुरवात केली असून उत्तरीय तपासणी नंतरच नेमकं मृतदेहाचं गूढ समोर येणार असल्याचे पोलीस म्हणाले. 


इतर महत्वाची बातमी : 


Nashik Protest : पहाटे पत्नीच्या डोक्यात मुसळी घातली, नंतर स्वतःही जीवनयात्रा संपवली, नाशिकच्या आडगाव येथील मर्डर मिस्ट्री