Nashik Hit and Run Case : परदेशी पर्यटकांनी नाशकात हिट अँड रन केल्याचा प्रकार समोर आलाय. परदेशी महिलेने रिक्षा चालवत एका दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. नाशकातील नारायण गाव येथे ही घटना घडली आहे. दरम्यान, दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर विदेशी पर्यटकांनी पळ काढला होता. मात्र, सध्या विदेशी पर्यटक पोलिसांच्या देखरेखेखाली आहेत. 


घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले


अधिकची माहिती अशी की, परदेशी पर्यटकांनी धडक दिल्याने दुचाकीस्वार असलेल्या नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झालाय. दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्यानंतर घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले आहेत. सध्या चारही पर्यटक नारायण गाव पोलिसांच्या निगरानीत आहेत. परदेशी पर्यटकांनमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. 


पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त


नारायण गाव पोलिसांकडून संशयित पर्यटकांना नोटीस बजावण्यात आली आहे. रात्री ताब्यात घेता येत नसल्याने उद्या सकाळी नारायण गाव पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहेत. परदेशी पर्यटक पळून जाऊ नये म्हणून नाशिक आणि नारायण गाव पोलिसांकडून हॉटेल बाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती आले आहे. 


नाशिक ब्रेकिंग 


- परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रनची घटना 
- हीट अँड रन घटनेत नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू 
- रिक्षा चालवणाऱ्या परदेशी महिलेकडून दुचाकी स्वाराला धडक 
- घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले 
- चारही पर्यटक नारायण गाव पोलिसांच्या निगरानित 
- परदेशी पर्यटकांनमध्ये तीन पुरुष दोन महिलांचा समावेश 
- नारायण गाव पोलिसांकडून संशयित पर्यटकांना नोटीस 
- रात्री ताब्यात घेता येत नसल्याने उद्या सकाळी नारायण गाव पोलीस घेणार ताब्यात 
- परदेशी पर्यटक पळून जाऊ नये म्हणून नाशिक आणि नारायण गाव पोलिसांचां हॉटेल बाहेर बंदोबस्त 
- पोलिसांनाडकडून पुढील तपास सुरू 
- अपघाताचा सीसीटीव्ही एबीपी माझाच्या हाती


हिट अँड रनच्या केसमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप 


गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात हिट अँड रनच्या अनेक केस समोर आल्या आहेत. पुण्यातील पोर्श कार हिट अँड रनच्या केसमुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर मुंबईतील वरळीतही हिट अँड रनचा प्रकार झाला होता. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या नावावर असलेल्या गाडीनेही चार ते पाच जणांना उडवले. दरम्यान, आता विदेशी पर्यटकांनी महाराष्ट्रात येत रिक्षा चालवत दुचाकी चालकाला उडवले आहे, यामध्ये एकाचा मृ्त्यू झाल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय. 


इतर महत्वाच्या बातम्या


Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन