Pune Crime : मित्राच्या पत्नीला परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेवणाचा आग्रह करणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील महिला पोलिसाचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील वाहतूक पोलीस विभागात ही महिला पोलीस कार्यरत होती. अनघा ढवळ असं आरोपी महिला पोलिसाचे नाव आहे. इन्स्टा स्टार म्हणूनही तिची ओळख आहे. पीडित महिलेने याबाबत कोल्हापुरातील गडहिंग्लज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर अनघा ढवळेवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु
अधिकची माहिती अशी की, आरोपी अनघा सुनील ढवळे हिची कोथरुडच्या वाहतूक पोलीस विभागात नेमणूक करण्यात आली होती. ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषासोबत शारिरिक संबंध ठेव, अन्यथा तुझ्या घरातील लोकांना ठार मारु, अशी धमकी दिली होती. दरम्यान, महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर ढवळेचे निलंबन करण्यात आले आहे.
माझी गुंडांबरोबर ओळख आहे
मी पुण्याची लोकल आहे, माझी गुंडांबरोबर ओळख आहे. आम्ही एक सामाजिक संस्था चालवतो. आम्ही ब्लॅक मनीचे लीगलमध्ये रुपांतर करतो. आमचे 9 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. तुझ्या नवऱ्याला 40 ते 50 लाख रुपये मिळतील, असंही ढवळे हिने पीडित महिलेला सांगितले होते. दरम्यान, पीडित महिलेने कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात तक्रार दाखल केली. यानंतर तिचे निलंबन करण्यात आले आहे.
पुण्यात गुन्हेगारीचं सत्र सुरुच, उरळी कांचनमध्ये गोळीबार
पुण्यातील उरळी कांचनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आलीये. उरुळी कांचन येथील इनामदार वस्ती येथे गोळीबाराची घटना घडली आहे. बापू शितोळे या व्यक्तीकडून तीन ते चार व्यक्तींवर गोळाबार करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. बापू शितोळे याच्याकडून अंधाधुंद गोळीबार करण्यात आलाय. गोळीबारात काळुराम गोते जखमी झालाय.
इतर महत्वाच्या बातम्या