Congress on Sanjay Gaikwad, सिंधुदुर्ग : "शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार, गायकवाड म्हणाले होते. दरम्यान गायकवाडांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. "ज्यांची अकरा रुपयांची लायकी नाही ते संजय गायकवाड अकरा लाखाचे बक्षीस देण्याची भाषा करत आहेत", असं म्हणत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सोनल घाग यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय. त्या कोकणात बोलत होत्या.






संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची गृहखात्याने दखल घ्यावी


राहुल गांधी हे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. संजय गायकवाड यांच्या वक्तव्याची गृहखात्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी  महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी केली आहे. आगामी निवडणुकीत जनता यांना थारा देणार नाहीत. हे माहित असल्याने संजय गायकवाड विथरलेत, असंही घाग म्हणाल्या.


शिंदे गट आणि भाजपाला निवडणुकीत पराभवाची भीती 


पुढे बोलताना सोनल घाग म्हणाल्या, शिंदे गट आणि भाजपाला निवडणुकीत पराभवाची भीती आहे. देशात सांविधान आणि कायदा आहे. याचा भाजप आणि संजय गायकवाड यांना विसर पडलाय. लोकसभेच्या अध्यक्षाची जीभ छाटण्याची भाषा करणे गंभीर गुन्हा आहे. गायकवाड यांच्या वक्तव्याची दखल घेऊन कारवाई व्हावी, अशी मागणीही यावेली काँग्रेस नेत्या घाग यांनी केली. 


संजय गायकवाड काय काय म्हणाले होते?


संजय गायकवाड म्हणाले की, जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे. राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के  आरक्षण संपवायचं आहे. आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी हे जे शब्द बोलले की, आम्हाला आरक्षण संपवायचंय. माझं आवाहन आहे की, जो राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस मी माझ्या वतीनं देईल. 


इतर महत्वाच्या बातम्या 


राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली