एक्स्प्लोर

Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल

Nashik Crime News: नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत केवळ लैंगिक शोषणच नाही, तर धार्मिक कट्टरतेचे एक भयानक जाळे पसरल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे.

Nashik Crime News: नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत केवळ लैंगिक शोषणच नाही, तर धार्मिक कट्टरतेचे एक भयानक जाळे पसरल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. विशिष्ट धर्माच्या तरुण-तरुणींनी संगनमताने इतर धर्मीय तरुणींना 'टार्गेट' करण्यासाठी व्हॉट्सॲपवर गुप्त गट (WhatsApp Groups) तयार केले होते, अशी धक्कादायक माहिती एसआयटी (SIT) तपासात उघड झाली आहे.

Nashik Crime News: व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे 'पुढचे लक्ष्य' निश्चित

मिळालेल्या माहितीनुसार, या नामांकित कंपनीत विशिष्ट समुदायातील तरुण-तरुणींचा एक व्हॉट्सॲप ग्रुप सक्रिय होता. या ग्रुपवर केवळ कंपनीतील राजकारण किंवा गटबाजीच नाही, तर 'पुढचे लक्ष्य' कोणाला करायचे, यावरही चर्चा व्हायची, असा संशय पीडित तरुणींनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, ज्या तरुणींना जाळ्यात ओढले जायचे, त्यांच्यासाठी पुन्हा एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप बनवून त्यांचे ब्रेनवॉश केले जात असे.

Nashik Crime News: अशी होती 'कार्यपद्धती' 

संशयित आरोपी तरुणींना जाळ्यात ओढण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पावले उचलत होते. संशयित तरुण स्वतःला 'सिंगल' असल्याचे भासवून तरुणींचे कौतुक करायचे, त्यांच्याशी गोड बोलून फ्लर्टिंग करायचे आणि नंतर जेवणाच्या बहाण्याने बाहेर न्यायचे. कंपनीतील कामाचा फायदा घेत, "तुला हव्या त्या ठिकाणी बदली करून देतो किंवा रजा मिळवून देतो," असे सांगून तरुणींना उपकृत करायचे आणि त्यातून जवळीक साधण्याचा प्रयत्न व्हायचा. ज्या तरुणींनी या आमिषांना बळी पडण्यास नकार दिला, त्यांना मानसिक त्रास दिला जायचा, ज्यामुळे अनेक तरुणींनी नोकरीचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

Nashik Crime News: नाशिकमध्ये 9 गुन्हे दाखल

या कटात केवळ तरुणच नाही तर तरुणींचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी नऊ गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांत आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरूख कुरेशी, दानिश शेख ‘एसआयटी’च्या कोठडीत असून, निदा खान हिचा शोध सुरू आहे. एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी आणि धार्मिक कट्टरतेचे प्रकार घडत असल्याने नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

Nashik Crime News: कंपनी प्रशासनावर कारवाई करा, भाजपची मागणी

दरम्यान, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाकडून नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीच्या बाहेर आंदोलन करण्यात आली. कंपनीमध्ये महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याने युवा मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस कंपनी परिसरात दाखल झालेले होते. पोलिसांसोबत दंगा नियंत्रण पथक देखील दाखल झाले होते. यामुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत कंपनीत दाखल झाल्या. कंपनी प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.  

आणखी वाचा 

Nashik Crime News: 'लिप्स्टिक' लावणं सोडलं, हिंदू तरुणींसोबत जेवणंही नाकारलं; नाशिकच्या नामांकित कंपनीतील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी स्टोरी

महत्त्वाच्या बातम्या

Tv actress Crime News: चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
चारित्र्यावर संशय, दागिनेही ठेवून घेतले, आईवडीलांशी बोलण्यास मज्जाव ; प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या सासरच्या मंडळींवर हिंसाचाराचा गुन्हा
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Embed widget