एक्स्प्लोर

Nashik Crime News: नाशिकमध्ये 2022 पासून कट्टरतेचं जाळं? कामानंतर कंपनीतच संशयितांच्या गुप्त हालचाली, धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा

Nashik Crime News: नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत समोर आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने आता अधिक भीषण वळण घेतले आहे.

Nashik Crime News: नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीत समोर आलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाने आता अधिक भीषण वळण घेतले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाला (SIT) एका माजी कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीमुळे तपासाची व्याप्ती वाढली आहे. आरोपी हे केवळ काम करण्यासाठी नाही, तर त्यांचे 'विशिष्ट मनसुबे' पूर्ण करण्यासाठी सुटीनंतरही कंपनीत संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती समोर आली आहे.

Nashik Crime News: 2022 पासून कट्टरतेचे जाळे?

एसआयटीला संशय आहे की, मुख्य आरोपींनी 2022 पासूनच कंपनीत कट्टरतेचे विचार रुजवण्यासाठी आणि विशिष्ट धर्माच्या प्रसारासाठी जाळे विणण्यास सुरुवात केली होती. केवळ कामाच्या नावाखाली कंपनीच्या मालमत्तेचा आणि वेळेचा वापर करून काही महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवले जात होते. तर आपले मनसुबे पूर्ण करण्यासाठी संशयित काम संपल्यावर घरी न जाता कंपनीत विशिष्ट हालचाली करायचे, अशी माहिती एका माजी कर्मचाऱ्याने एसआयटीला दिल्याची माहिती समोर येत आहे.  

आता महिलांचे लैंगिक आणि धर्मांतर प्रयत्न प्रकरणाची तपासणी वेगाने सुरू आहे. संशयितांना देशाबाहेरील व्यक्ती / संघटनांकडून फंडिंग होते का? याबाबतचा तपास एसआयटीकडून सुरू सुरु आहे. तर कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची देखील एसआयटीकडून चौकशी केली आहे. तसेच ई-मेल, चॅट्स, कॉल रेकॉर्ड, धमक्या यांची देखील तपासणी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 

Nashik Crime News: अश्विनी चैनानीच्या कोठडीत वाढ

दरम्यान, या प्रकरणातील महत्त्वाची संशयित आणि कंपनीची एजीएम अश्विनी चैनानी हिच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. कंपनीच्या सर्व्हरवरून चैनानीला पाठवलेले 78 ई-मेल्स तपासाच्या रडारवर आहेत. हे ई-मेल्स पीडितांच्या तक्रारींचे होते की गुन्ह्याचा कट रचण्यासाठी, याचा शोध सुरू आहे. चैनानी आणि मुख्य संशयित तौसिफ अत्तार यांच्यात गेल्या दोन वर्षांत 38 वेळा संभाषण झाले आहे. दानिश शेख आणि रझा मेमन या संशयितांशीही ती नियमित संपर्कात होती. पीडितेने विनयभंगाची तक्रार केली असता, तिला मदत करण्याऐवजी "तुमको क्या हायलाईट होना है?" असे म्हणत चैनानीने तिचा आवाज दाबल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.

Nashik Crime News: पॉश समितीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आश्विनी चैनानी या लैंगिक छळ प्रतिबंधक समितीच्या (पॉश) सदस्य असतानाही 2023 पासून सुरू असलेल्या अत्याचारांकडे त्यांनी दुर्लक्ष का केले, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पीडितेवर मानसिक दबाव टाकून तिला हतबल करण्यात चैनानी यांची मोठी भूमिका असल्याचा संशय बळावला आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Anjali Damania: अशोक खरात प्रकरणात आता थेट नाशिक पोलीस आयजींचं नाव, अंजली दमानियांनी 'तो' व्हिडीओ शेअर करत केला खळबळजनक दावा; म्हणाल्या...

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Cyber Crime : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा AI Deepfake व्हिडीओ, पुण्यातील व्यापाऱ्याला 1 कोटींचा गंडा, अनेकजण बळी
Digital Arrest : आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
आधार-पॅन कार्डचा मनी लॉड्रिंगमध्ये वापर, सुप्रीम कोर्टचे वॉरंट... डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधी लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget