Nashik Crime: नाशिकमध्ये दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी पोलिसांसाठी (Nashik Police) डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी ठोस पाऊले उचलली जात आहे. मात्र गुन्ह्यांच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दहशतीखाली वावरावे लागत आहे. अशातच चोरट्यांकडून वृद्ध माणसांना लक्ष्य केले जात आहे. नाशिकमध्ये आणखी एका वृद्धाला लुटल्याची घटना घडली आहे.
बँकेत दरोडा टाकल्याप्रमाणे वृद्धाच्या पैशाने भरलेल्या बॅगेवर दरोडा टाकण्यात आला आहे. विशेष म्हणजे वृद्धाच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीनेच मित्राच्या मदतीने वृद्धाची बॅग लंपास केली आहे. स्विफ्ट कारसह 66 लाखांची रोकड पळवली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. नाशिकच्या कुलकर्णी गार्डन परिसरात ही घटना घडली आहे.
नाशिक शहरातील होलाराम कॉलनी परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक कन्हैयालाल मनवानी यांच्यासोबत मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. मनवानी हे सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कुलकर्णी गार्डन परिसरातील आपल्या कार्यालयातून बाहेर पडले. ते
कन्हैयालाल मनवानी हे त्यांच्या चालकासोबत स्विफ्टमध्ये बसून घरी जात होते. चालकाने घराजवळ गाडी येताच त्याच्या एका मित्राला गाडीत बसवले. आणि थेट नाशिक मुंबई महामार्गावरील विल्होळी परिसरात नेऊन गाडी थांबवली. मनवानी यांना पिस्तूलचा धाक दाखवत त्याने त्यांच्याकडील 66 लाखांची रोख रक्कम आपल्या ताब्यात घेतली आणि स्विफ्ट गाडी घेऊन धूम ठोकली. दरम्यान, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या घटनांनी नाशिक शहर दहशतीखाली असून कोणता माणूस कधी चोरी, मारहाण, लूटमार करेल हे सांगता येणं अवघड झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :