Nashik Crime : जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने एका युवकाचा निघृण खून केल्याची घटना कामगारनगर परिसरातील संत कबीरनगर (Sant Kabirnagar) येथे शनिवारी रात्री घडली. अरुण राम बंडी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) तपासाची चक्र फिरवत खुनातील संशयित आरोपींना 48 तासांच्या आत जेरबंद केले आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, सातपूर परिसरातील कामगारनगर परिसरातील संत कबीरनगर येथे अरुण राम बंडी हा रात्रीच्या सुमारास आला असता त्याचा कबीरनगर झोपडपट्टीत राहणाऱ्या काही संशयितांसोबत वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी कोयते, लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉडच्या सहाय्याने टोळक्याने अरुण बंडीवर हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. 


जुन्या वादातून हत्या


या घटनेचे वृत्त समजताच मोठा जमाव या ठिकाणी जमला. गंगापूर पोलिसांबरोबरच दंगापथकही घटनास्थळी दाखल झाले. तसेच युनिट एकचे पथकही दाखल झाले. त्यांनी रात्रीच परिसरात शोध घेऊन यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले. तर सकाळी एकास पकडले होते. फरार संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. जुन्या वादातून हा प्रकार घडला होता. मयत हा अंबड येथील राहणारा असून, त्याच्याविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. बंडी जाब विचारण्याकरिता संत कबीरनगरमध्ये आला होता. या वादात त्याचा टोळक्याने खून केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, गंगापूरचे पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर या पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी रात्रीच दाखल झाला होता. 


संशयित आरोपी जेरबंद


पोलिसांनी मृत अरुण बंडीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. जिल्हा रुग्णालयातही मोठा जमाव जमला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात होता. आता पोलिसांनी संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Satish Bhosale: बीडचा 'आका' कराडप्रमाणेच 'खोक्या भाई' करणार मर्जीने सरेंडर करणार? पाच दिवसांपासून फरार, माध्यमांना मुलाखत पण पोलिसांना सापडेना


Beed Crime Satish Bhosale: लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर