Mohammed Shami IND vs NZ Final : टीम इंडियाने 12 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करीत तिसऱ्यांदा विजेता ट्रॉफी उंचावली. रोहित शर्माच्या नेतृत्वात नऊ महिन्यांत भारताचे हे दूसरे आयसीसी जेतेपद आहे. 29 जून 2024 ला भारतीय संघाने आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.


दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे तिसरे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू जल्लोषात मग्न होते. सर्व खेळाडूंनी खूप आनंद होते आणि विजय सेलीब्रेशन पण धुमधडाका साजरी केले. मात्र, ट्रॉफी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू सेलीब्रेशन करत असताना, मोहम्मद शमी भारतीय संघाला स्टेजवर सोडताना दिसला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


मोहम्मद शमीचा सेलिब्रेशनमधून काढता पाय...


रोहित शर्माने आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांच्याकडून चॅम्पियन्स ट्रॉफी स्वीकारली. यानंतर त्यांनी सर्व खेळाडूंना स्टेजवर येण्यास सांगितले. शमीही संघासोबत स्टेजवर आला. पण स्टेजवर शॅम्पेनची बाटली उघडताच मोहम्मद शमी संघ सोडून मागे पळाला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर, इस्लाम धर्मात शॅम्पेन पिणे आणि स्पर्श करणे निषिद्ध आहे. कदाचित म्हणूनच शमी स्टेजवरून खाली गेला.






भारतीय संघ 4 मार्च रोजी दुबई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला उपांत्य सामना खेळेल. यादरम्यान, शमी सीमारेषेवर एनर्जी ड्रिंक पिताना दिसला, त्यानंतर त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. रमजानमध्ये उपवास न ठेवल्याबद्दल काही वापरकर्ते त्याला ट्रोल करताना दिसले. पण, अनेक माजी भारतीय खेळाडू आणि अनेक इस्लामिक धार्मिक नेत्यांनी या प्रकरणात शमीला पाठिंबा दिला होता आणि टीकाकारांना उत्तर दिले.


शमीची धमाकेदार कामगिरी 


2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने शानदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताकडून शमी आणि वरुण चक्रवर्ती यांनी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. शमीने 5 सामन्यात 9, तर वरुणने 3 सामन्यात 9 विकेट घेतल्या.


चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत अपराजित


चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा विजय विशेष आहे, कारण संपूर्ण स्पर्धेत टीम इंडिया अपराजित राहिली. गट टप्प्यात, त्यांनी प्रथम बांगलादेशला 6 गडी राखून पराभूत केले आणि नंतर त्याच फरकाने पाकिस्तानला पराभूत केले. तर भारताने गट फेरीत न्यूझीलंडचा 44 धावांनी पराभव केला. उपांत्य फेरीत, भारताने ऑस्ट्रेलियाच्या कमकुवत गोलंदाजीचा पुरेपूर फायदा घेतला आणि 4 विकेट्सने विजय मिळवला. आता अंतिम सामन्यात टीम इंडियाने किवींना 4 विकेट्सने हरवून जेतेपद पटकावले.