बीड: भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेवर बीडच्या शिरूर पोलिस ठाण्यात दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो चार दिवसांपासून फरार आहे. त्याच्या शोधासाठी शिरूरसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके धावपळ करत आहेत. परंतु, हा खोक्या देखील वाल्मीक कराडप्रमाणेच सरेंडर होणार असल्याची माहिती आता सुत्रांनी दिली आहे. कराड बाबतही अशीच माहिती दोन दिवस अगोदर बाहेर आली होती. खोक्या उर्फ सतीश भोसले याने बुलढाणा जिल्ह्यातील एका व्यक्तीला अर्धनग्न करून बॅटने बेदम मारहाण केली होती. याचा व्हिडीओ 5 मार्च रोजी व्हायरल झाला. त्यानंतर याच खोक्याकडून पैशांचे बंडल फेकणे, हेलिकॉप्टरमधून उतरणे, हातात, गळ्यात सोन्याचे दागिने असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर वन विभागाला वाळलेले मांस, हत्यार, शिकारीचे जाळे आणि इतर साहित्य आढळले होते. तसेच दिलीप ढाकणे व महेश ढाकणे यांना कुऱ्हाड व सत्तूरने बेदम मारहाण केल्याचे वन विभागात 1, शिरूरमध्ये 2 असे 3 गुन्हे दाखल आहेत.
पुराव्यासह लवकरच पोलिसांना खोक्या शरण येणार?
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची आलिशान कार पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागील पाच दिवसांपासून फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके रवाना असून अद्याप पोलिसांना तो सापडलेला नाही. तर सतीश भोसलेने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर येतेय. या संपूर्ण प्रकरणात दोषी नसून पुराव्यासह पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची आलिशान कार पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर सतीश भोसले मागील पाच दिवसांपासून फरार आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके रवाना असून अद्याप पोलिसांना तो सापडलेला नाही. तर सतीश भोसलेने न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषी नसून पुराव्यासह पोलिसांना शरण येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मारहाण प्रकरणात जामिनीसाठी सतीश उर्फ खोक्या भाईचा अटकपूर्व जामीन अर्ज केला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन वकिलाच्या मार्फत दाखल केला आहे. बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी होणार अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.
नेमका कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद होते. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले.अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे. सतीश भोसलेने शिरुर गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. सतीश भोसलेने केलेल्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान खोक्या भाईला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे.