नाशिक : शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गंगापूररोड (Gangapur Road) परिसरातून ओळखीतील संशयितांनी मित्राला हत्याराचा धाक दाखवून जबरीने गाडीवर बसविले आणि राजीवनगर (Rajivnagar) परिसरात नेत बेदम मारहाण केली. त्यावेळी त्याचा भाऊ सोडविण्यासाठी आला असता संशयितांनी त्याच्या डोक्यात कोयता मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिकच्या (Nashik Crime News) गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोशन जाधव, रोहन नामदास, अनिकेत उर्फ अंड्या शार्दुल, अजय कापसे (सर्व रा. गोवर्धन, गंगापूर गाव) असे संशयितांची नावे आहेत.
याबाबत सनी खंडू जाधव (19, रा. राजवाडा, गंगापूर गाव) या युवकाने फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, त्याच्या ओळखीतील संशयित चौघांनी सनीला धारदार हत्याराचा धाक दाखविला आणि गाडीवर बसविले. त्यानंतर त्यास राजीवनगर परिसरात नेत शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
वाचवायला गेलेल्या भावाच्या डोक्यात मारला कोयता
भावाला नेल्याची माहिती मिळताच सनीचा लहान भाऊ समीर त्यास सोडविण्यासाठी पोहोचला. त्यावेळी संशयितांनी त्यालाही मारहाण सुरू केली. तर एकाने त्याच्या डोक्यातच कोयता मारून गंभीर दुखापत केली. तसेच पायांवर दगडाने मारत त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जखमी समीरवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
संशयित रेकॉडवरचे गुन्हेगार
संशयित रोहन नामदास याच्याविरोधात नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा तर, अनिकेत उर्फ अंड्या याच्याविरोधात गंगापूर पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याचे यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. चौघांपैकी दोघे रेकॉडवरचे गुन्हेगार आहेत. मागील वादातून हे अपहण व प्राणघातक हल्ला झाल्याचे समजते.
उपनगरमध्ये गुंडांचा हैदोस
दरम्यान, शहरातील काही स्थानिक गुंडांनी रहिवाशांनी किरकोळ विक्रेते व व्यावसायिकांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी उकळण्यासाठी दबाब आणल्याचे प्रकार वाढत आहेत. उपनगर हद्दीत अशाच स्वरुपाचे दोन गुन्हे घडले असून सराईतांनी एका पाणीपुरी विक्रेत्यासह ट्रॅव्हल्स व्यावसायिकास धमकावल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून तिघेही गुंड पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
आणखी वाचा