Taurus Weekly Horoscope 14 To 20 October 2024 : राशीभविष्यानुसार, वृषभ राशीसाठी नवीन आठवडा थोडा नाराजीचा असेल. हा आठवडा काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. या आठवड्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? वृषभ राशीचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या...
वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope)
तुमची लव्ह लाईफ अजून बहरण्यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. या आठवड्यात जोडीदारासोबत तुमचे किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु आठवड्याच्या अखेरीस सर्व वाद सोडवावे लागतील. जास्त वाद झाल्यास तुम्ही थोडं शांतीत घ्या. तुमच्या जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा आणि तुमचं नातं अधिक घट्ट करा. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुमच्या घरातल्यांशी भेटवायचं असेल आणि लग्नाबद्दल बोलायचं असेल तर हा आठवडा चांगला आहे. काही लोकांच्या प्रेमाचं रुपांतर प्रेमविवाहात होईल.
वृषभ राशीचे करिअर (Taurus Career Horoscope)
नवीन आठवड्यात तुमच्या ऑफिसमध्ये एखादी कल्पना मांडताना काळजी घ्या. कदाचित तुमच्या काही वरिष्ठांना ही गोष्ट आवडणार नाही आणि ते तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न करतील. याचा परिणाम तुमच्या मनोबलावर होईल. ऑफिसमध्येही वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा. वकील, नोकरदार, वास्तुविशारद, प्राध्यापक, लेखक, कलाकार, स्वयंपाकी आणि कॉपीरायटर यांना या आठवड्यात यश मिळेल.
वृषभ राशीची आर्थिक स्थिती (Taurus Wealth Horoscope)
नवीन आठवड्यात अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. या आठवड्यात तुम्हाला अनेक ठिकाणांहून पैसे मिळतील. रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी आठवड्याचे दोन-तीन दिवस चांगले असणार आहेत. व्यावसायिकांना गुंतवणुकीसाठी चांगले स्रोत मिळतील, पण सर्व अभ्यास करुनच गुंतवणूक करा. महिलांना काही आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागेल. या आठवड्यात तुमच्याकडून काही व्यवहार चुकू शकतात, त्यामुळे पैशाचे व्यवहार जपून हाताळा.
वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope)
नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. दीर्घकाळ चालणाऱ्या आजारांपासून आराम मिळेल. गरोदर महिलांनी साहसी आणि वजन उचलण्याची कामं टाळावी, यासोबतच दारू आणि तंबाखूचं सेवन टाळावं. हाय बीपीच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. दररोज व्यायाम करा आणि आरोग्याशी संबंधित लहानसहान समस्यांकडे दुर्लक्ष करू नका.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: