Nashik Crime News नाशिक : गंगापूर (Gangapur) येथील घटनेच्या पाठोपाठ सातपूरमधील श्रमिकनगर (Shramiknagar, Satpur) परिसरात रविवारी मद्यपी टोळक्याने गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी पोलिसांनी (Nashik Police) पाच जणांना ताब्यात घेतले असून अन्य संशयितांना शोध सुरु आहे. पाच जणांपैकी चार जण हे सराईत गुन्हेगार (Nashik Crime News) असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रमिकनगरमधील सात माउली चौक परिसरात नागरिकांच्या घरासमोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडण्याची घटना रविवारी पहाटे घडली. मात्र, मद्यपी टोळक्याचा मध्यरात्री १ वाजेपासून परिसरात धुडगूस सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पाच जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात


याप्रकरणी पोलिसांनी सागर भगवान हलनोर, सुधीर भारत भालेराव (27), ऋषिकेश उर्फ संकेत पुंडलिक पवार (27), दीपक राजेंद्र आहिरे (27), मिलिंद पिराजी मुंढे (20, सर्व रा. श्रमिकनगर, सातपूर) या पाच जणांन अटक केली आहे. या संशयितांचे आणखी काही साथीदार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. 


संशयितांना दोन दिवसांची पोलीस कोठडी


अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील सुधील भालेराव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे.तसेच मुंढे वगळता चौघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


गंगापूर रोडवर गाड्या फोडणाऱ्यांची धिंड


दरम्यान, गंगापूर जकात नाका (Gangapur Road) येथे रस्त्याने जाणाऱ्या गाड्या अडवून त्यांच्यावर दगडफेक करीत काचा फोडणाऱ्या पाच संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांची पिंड काढली. हे पाचही संशयित फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी गुप्त खबऱ्यामार्फत शोध घेतला. अनिकेत उर्फ पप्पू शार्दल, प्रतीक जाधव, विजय कोटरे, चिंटू गागुंडे, रोहित वाडगे हे सर्व शिवाजीनगर, ध्रुवनगर भागात राहतात. त्यांना कोकणगाव (ता. दिंडोरी) येथून पथकाने ताब्यात घेतले. सर्व संशयित हे 19 ते 20 या वयोगटातील आहेत. त्यांना अटक केल्यानंतर पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, गिरीश महाले, वाकचौरे यांनी या संशयितांची ज्या भागात काचा फोडल्या त्या भागातून धिंड काढली. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nashik : दुचाकी चोरट्यांचा मुख्य सूत्रधार जेरबंद, 10 लाखांच्या मोटारसायकली जप्त


Nashik : विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्याला ठोकल्या बेड्या, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त