Stock Market Closing Update : शेअर बाजारातील आजचा दिवस हा गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरल्याचं दिसून आलं. या आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत ऐतिहासिक ठरले. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) आतापर्यंत सर्वात उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवहाराअंती राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 81 अंकांच्या उसळीसह 22,122 अंकांवर बंद झाला. तर दिवसाच्या व्यवहारात निफ्टीने 22,186 अंकांची पातळी गाठली होती, जी त्याची विक्रमी उच्चांकी पातळी आहे. BSE सेन्सेक्स 281 अंकांच्या उसळीसह 72,281 अंकांवर बंद झाला.

विक्रमी उच्च बाजार मूल्य

शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे बाजार भांडवल विक्रमी उच्चांक गाठले. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप प्रथमच 392 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेलं आहे. बाजार बंद होत असताना बीएसई मार्केट कॅप 391.74 लाख कोटी रुपयांवर बंद झाला, जो गेल्या ट्रेडिंग सत्रात 389.41 लाख कोटी रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच आजच्या व्यवहारात बाजाराच्या बाजारमूल्यात 2.33 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

कोणत्या क्षेत्रातील शेअर्स वधारले?

आजच्या व्यवहारात ग्राहकोपयोगी वस्तू, एफएमसीजी, बँकिंग, ऑटो, फार्मा, ऊर्जा, इन्फ्रा, हेल्थकेअर, तेल आणि वायू क्षेत्रातील समभाग मोठ्या वाढीसह बंद झाले. तर सरकारी कंपन्यांचा निर्देशांक, रिअल इस्टेट, सरकारी बँकांचा निर्देशांक आणि आयटी समभागांचा निर्देशांक घसरणीसह बंद झाला. मिड-कॅप आणि स्मॉल शेअर्समधील खरेदीमुळे दोन्ही निर्देशांक जोरदार वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 17 समभाग वाढीसह आणि 13 समभाग तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या 50 समभागांपैकी 28 समभाग वाढीसह आणि 22 समभाग तोट्यासह बंद झाले.

इंडेक्‍सचे नाव बंद झालेला स्तर उच्‍च स्‍तर निम्‍न स्‍तर किती टक्के बदल
BSE MidCap 40,044.47 40,219.02 40,006.37 00:04:11
BSE Sensex 72,706.51 72,881.93 72,308.68 0.39%
BSE SmallCap 46,022.75 46,122.41 45,901.79 0.80%
India VIX 16.02 16.12 13.70 5.22%
NIFTY Midcap 100 49,310.95 49,524.85 49,263.90 0.36%
NIFTY Smallcap 100 16,258.30 16,331.45 16,231.55 0.40%
NIfty smallcap 50 7,546.00 7,595.25 7,535.00 0.11%
Nifty 100 22,618.25 22,686.05 22,527.75 0.34%
Nifty 200 12,240.95 12,278.75 12,198.60 0.35%
Nifty 50 22,122.25 22,186.65 22,021.05 0.37%

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स

आजच्या व्यवहारात बजाज फिनसर्व्ह 2.29 टक्क्यांनी, ICICI बँक 2.04 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 1.77 टक्क्यांनी, ITC 1.58 टक्क्यांनी तर लार्सन 1.11 टक्क्यांनी, TCS 0.70 टक्क्यांनी घसरून बंद झाले.

ही बातमी वाचा: