Nashik Crime News नाशिक : गुजरातमधील सुरत येथे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर मुंबई - आग्रा महामार्गावरील (Mumbai - Agra Highway) घोटी टोलनाका परिसरात पोलिसांनी (Police) सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 1 लाख 8 हजार रुपयांच्या विदेशी मद्यासह (Foreign liquor) सुमारे 12 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन असा सुमारे 13 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 


तसेच चारचाकी वाहनाचा चालक संशयित किरीट हरीलाल बारैय्या (रा. सुरत, गुजरात) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील सुरत येथे नेण्यासाठी मुंबई - आग्रा महामार्गावरून चारचाकी वाहनातून विदेशी मद्याची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळली होती. 


सापळा रचून पकडले वाहन


या माहितीच्या आधारे पोलीस उपनरीक्षक अनिल ढोमसे व पोलीस पथकाला घोटी टोल नाक्यावर तैनात करून सापळा लावण्यात आला होता. यावेळी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मद्याची चोरटी वाहतूक सुरू असताना पोलिसांनी कारवाई करीत मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनाला अडविले. या वाहनाची तपासणी केली असता त्यात लाखो रुपयांचा विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. 


महाराष्ट्रातून गुजरातमध्ये विदेशी मद्याची तस्करी


पोलिसांनी हा मद्यसाठा जप्त केला आहे. या कारवाईत संशयित वाहनाच्या चालकालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीतून हा मद्यसाठा चारचाकी वाहनातून गुजरात राज्यातील सुरतकडे तस्करी करण्यात येत असल्याची माहिती समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस शिपाई सतिष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत


संशयित कारचालक किरीट हरीलाल बारैय्या याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत कारमध्ये 1 लाख 8 हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या विदेशी मद्याच्या व्हिस्कीच्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी या मद्यसाठ्यासह सुमारे 12 लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहनही हस्तगत केले आहे. तसेच मद्य लपविण्यासाठी या वाहनात छुपे कप्पे बनवण्यात आले होते. त्यात विदेशी मद्यसाठा लपवून तस्करी करण्यात केली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Pune : पुण्यात पुन्हा एकदा अल्पवयीन तरुणांची 'गुंडगिरी', हाती कोयता घेत वाहनांची तोडफोड, पोलिसांकडून अटक


Nagpur Crime News : नातवाला शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत आजीला 21 लाखांना गंडवले; गुन्हा दाखल