Nashik Crime News नाशिक : राजूर, भंडारदरा परिसरातून दुचाकींची चोरी करत इगतपुरी, घोटी, वाडीवऱ्हे, आंबेवाडी, कावनई, उभाडे या ठिकाणी दुचाकी (Two Wheeler) विकत घेणाऱ्या सहा-सात संशयितांना राजूर पोलीस (Police) पथकाने ताब्यात घेतले होते. आता पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला ताब्यात घेतले आहे. तसेच दोन बुलेट आणि 8 रेसर मोटारसायकली असा १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला आहे. शंकर एकनाथ गांगड (रा. उभाडे, ता. इगतपुरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
अकोले तालुक्यातील राजूर येथे चंद्रकांत गंगाधर भडांगे व भंडारदराच्या शेंडी येथील संतोष पवार यांच्या बुलेट मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी राजूर पोलीस स्टेशनमध्ये ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांनी घटनास्थळी भेटी दिली होती.
मुख्य सूत्रधार जेरबंद
गुन्हा करण्याची कार्यपद्धती पाहून तसेच सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या खात्रीलायक माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील संशयित मुख्य सूत्रधार शंकर एकनाथ गांगड (रा. उभाडे, ता. इगतपुरी) यास ताब्यात घेण्यात आले. त्यास गुन्ह्यातील गेलेल्या मालाबाबत सखोल चौकशी करता त्याने राजूर व शेंडी येथील दोन बुलेट मोटारसायकलसह त्याच्या साथीदारांसोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून या गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटारसायकल आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आल्या.
10 लाखांचा मुद्देमाल जप्त
तसेच गांगड यास अधिक विश्वासात घेऊन त्याच्याकडे इतर चोरी केलेल्या मोटारसायकलींबाबत विचारपूस करता त्याने इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरी केल्याबाबत माहिती दिली. त्याच्याकडून 10 लाख 80 हजार रुपयांच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सपोनि दीपक सरोदे, पोलीस उपनिरीक्षक शेख व पोलीस कर्मचारी पो. कॉ. अल्ताफ शेख, पो. कॉ. विजय मुंढे, पो. कॉ. कैलास नेहे यांनी केली आहे.
मालेगावलाही दुचाकी चोरट्याला अटक
मालेगाव, सटाणा, चांदवड, येवला, जळगाव व नाशिक शहरातून दुचाकींची चोरी करत विक्री करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस यंत्रणेस यश आले. एका चोरट्यास पोलिसांनी (Police) सापळा रचून अटक करत त्याच्याकडून 6 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 13 दुचाकी जप्त केल्या. तसेच या चोरीच्या दुचाकी घेणाऱ्या सहा जणांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आणखी वाचा
Nashik News : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर, 437 गावांमध्ये पाणीबाणी, नागरिकांचे हाल