Nashik Crime News नाशिक : पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या (Axis Bank) शाखेत तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बनावट डिमांड ड्राफ्ट भरून त्याचे पैसे काढून घेणारा संशयित आरोपी एस. के. ट्रेडिंगचे संचालक अनिकेत श्रीनिवास मुदंडा (रा. चिंचखेड रोड, महेशनगर, बालाजी मंदिराजवळ, पिंपळगाव बसवंत) याच्याविरुद्ध पिंपळगाव पोलीस ठाण्यात (Pimpalgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या प्रकरणी आणखी तीन संशयित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. याबाबत अ‍ॅक्सिस बँकेचे पिंपळगाव बसवंत शाखेचे व्यवस्थापक नितीन राजेंदरनाथ बाली (46, रा. क्लासिक अपार्टमेंट, बापू बंगल्याजवळ, नाशिक) यांनी तक्रार दाखल केली आहे. 


बोगस डिमांड ड्राफ्टद्वारे फसवणूक


या तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, संशयित अनिकेत मुदंडा याने पिंपळगावच्या अ‍ॅक्सिस बँकेत 3 कोटी 50 लाख रुपये किमतीचा बोगस डिमांड ड्राफ्ट दि. 30 जानेवारी 2024 रोजी भरला व त्याचे रोखीकरण करून घेतले. त्यामुळे बँकेची साडेतीन कोटींची फसवणूक झाली आहे.


बेंगळुरूच्या बँकेतही पाठवला सारखाच डिमांड ड्राफ्ट


दरम्यान, अशाच प्रकारचा डिमांड ड्राफ्ट बँकेच्या बेंगळुरू येथील साथीदाराने बेंगळुरूच्या बँकेत पाठविला. त्यावेळी बेंगळुरूच्या शाखेत लक्षात आले की, दोन्ही डिमांड ड्राफ्ट एकाच रकमेचे व सारख्याच नंबरचे आहेत. त्यावरून आरोपीने हेतूपूर्वक बँकेची फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यामुळे बँकेचे व्यवस्थापक नितीन बाली यांनी पिंपळगाव बसवंत पोलीस (Police) ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक दुर्गेश एम. तिवारी हे करीत आहेत.


नाशिकला तोतया पोलिसाने लांबविले वृद्धेचे दागिने


पोलीस असल्याचे खोटे सांगून दोन अज्ञात इसमांनी एका वृद्धेचे सोन्याचे दागिने पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून हातचलाखीने चोरून नेल्याची घटना गंगापूर रोड येथे घडली. फिर्यादी हेमलता सतीश गोगटे (70, रा. ग्रीन स्क्वेअर सोसायटी, गंगापूर रोड) ही महिला प्रसाद मंगल कार्यालयासमोरून पायी जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलेजवळ जाऊन आपण पोलीस असल्याचे खोटे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन करून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व हातातील सोन्याच्या बांगड्या पिशवीत ठेवण्याचा बहाणा करून नजर चुकवून चोरून नेले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nilesh Rane: दगडफेक होताच निलेश राणे तावातावाने गाडीतून उतरले, चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर नेमकं काय घडलं?


'जितेंद्र आव्हाडांच्या सडक्या मेंदूतील हे विषारी विचार, पुन्हा निवडून कसे येतात तेच पाहतो'; अजित पवारांवरील टीकेवरून अमोल मिटकरींचा पलटवार