Buffalo : बिहारची राजधानी पाटणा (Patna) येथे गुरुवारपासून बिहार डेअरी आणि कॅटल एक्स्पो 2023 चे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या एक्स्पोमध्ये डेअरी आणि पशुसंवर्धनाशी संबंधित डझनभर कंपन्यांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. दरम्यान, या एक्स्पोमध्ये एका रेड्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्या रेड्याची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहेत. या रेड्याची किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे.
रेड्याला राहण्यासाठी एसी रुम
हा रेडा हरियाणातून पाटणा येथे पोहोचला आहे. गोलू असं या रेड्याचे नाव आहे. हा रेडा डेअरी फार्ममधील एसी रुममध्ये राहतो. गोलू चारा खाण्यासोबतच रोज पाच किलो सफरचंद, पाच किलो हरभरा खाते. दररोज दोन लोक या रेड्याची मालिश करत असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली.
गोलू नावाचा रेडा हरियाणामधील
गोलू नावाचा हा रेडा हरियाणातून पाटणा येथे आणण्यात आला आहे. हा रेडा मुर्राह जातीचा आहे. या रेड्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये असल्याचे रेड्याच्या मालकाने सांगितले. यासाठी रेड्याचे मालक नरेंद्र सिंह यांना राष्ट्रपतींकडून पद्मश्रीही मिळाला आहे. या रेड्याचा उपयोग प्रजननासाठी केला जातो. 10 कोटी रुपयांच्या रेड्याचे मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, रेड्यावर दरमहा सुमारे 50 ते 60 हजार रुपये खर्च होतात. हा मौल्यवान रेडा यापूर्वीही अनेक शेतकरी मेळ्यांना गेली आहे.
गोलू-2 त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी
शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा 6 वर्षाचा गोलू-2 रेडा त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आहे. देशभरातील पशुपालकांना अशा रेड्याचा फायदा व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. आता सोशल मीडियावर या रेड्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मुर्रा म्हशीचं संगोपन
हरियाणा, दिल्ली, आणि पंजाबमधील रोहतक, हिसार, जिन्द आणि करनाल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुर्रा म्हशी आणि रेडे आढळतात. तसेच परदेशातही इटली, बल्गेरिया, इजिप्त इत्यादी देशात या म्हशी आढळतात. हरियाणामध्ये मुर्रा म्हशीला काला सोना असेही म्हणतात. दुधामध्ये चरबी उत्पादनासाठी मुर्रा ही उत्तम जात आहे. त्याच्या दुधात 7 टक्के चरबी आढळते. मुर्राह म्हशीची किंमत 50 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे. या म्हशीचे संगोपन करणे खूप फायदेशीर आहे. एक मुर्राह म्हैस एका दिवसात सुमारे 25 लिटर दूध देते. ज्यानुसार तुम्ही दररोज 1000 ते 1500 रुपये कमवू शकता.
महत्त्वाच्या बातम्या: