एक्स्प्लोर

Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ व्हायरल करताय? सावधान! पोलीस अॅक्शन मोडवर, गुन्हे दाखल

Ashok Kharat Case : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे पीडित महिलांची ओळख उघड होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आता कारवाई सुरू केली आहे. 

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित महिलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात यापूर्वी एक गुन्हा दाखल असताना आता दुसऱ्यांदा गुन्हा नोंदवण्यात आल्याने पोलिसांची कारवाई अधिक कडक होत असल्याचं दिसत आहे.

या प्रकरणात सिडको आणि सातपूर वॉलमन ग्रुपच्या ॲडमिनसह काही सदस्यांवर कारवाई करण्यात आली आहे. सिद्धार्थ रामोशे, रमिज शेख, राहुल पवार, प्रवीण काटे, राहुल हिवाळे, साहिल सैय्यद यांच्यासह इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलांचे व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे त्यांची ओळख उघड होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Viral Video Case Nashik : व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा

सोशल मीडियावर पीडित महिलांचे व्हिडीओ शेअर करणं हा गंभीर गुन्हा असून यामुळे संबंधित महिलांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा प्रकारे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.

Ashok Kharat Case : SIT कडून तपास सुरू

भोंदू अशोक खरात प्रकरणी महिलांचे लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपांवरून आधीच गुन्हे दाखल असून SIT मार्फत या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यातही खरातविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले गेले आहेत.

Police Warning On Ashok Kharat Case : पोलिसांचा इशारा

पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पीडितांचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सहभागी असलेल्यांची माहिती गोळा केली जात असून येत्या काळात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

Nashik Crime Update : मनपा कर्मचाऱ्यांचाही समावेश?

या व्हिडीओ व्हायरल प्रकरणात नाशिक महानगरपालिकेतील काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या अनुषंगानेही तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई केली जाणार आहे.

अहिल्यानगरमध्ये तिघांविरोधात कारवाई

अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरमधील कोपरगावात तीन जाणांविरोधात कारवाई करण्यात आली. पीडित महिलांचे व्हिडीओ देणार, घेणारा आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हा करण्यात येणार आहे. महिलांची ओळख पटेल असे व्हिडीओ जर व्हायरल केले तर व्हाट्सऍप ग्रुपवर तो व्हिडीओ शेअर करणारा, तसेच ग्रुप अॅडमिन विरोधात कारवाई केली जाणार आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget