नांदेड : आपल्या वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून अनेकदा कार्यालयीन कामाकाजातील कर्मचारी आत्महत्येसारखे (Crime News) टोकाचे पाऊल उचलतात. काहीवेळा पोलीस खात्यातही अशा घटना घडल्याचं समोर आलं आहे. आता, पुन्हा एकदा अशीच हादरवरुन टाकणारी घटना समोर आली आहे. त्यामध्ये, एका पोलीस पाटलाने (Police) चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच आपले जीवन संपवले. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून नातेवाईकांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील पेवा या गावात ही घटना घडली.दरम्यान, या घटनेनंतर तात्काळ गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली होती. तर, तालुका ग्रामीण पोलिसही घटनास्थळी पोहोचले.

  


पेवा गावच पोलीस पाटील असलेल्या बालाजी जाधव यांनी आज ग्राम पंचायत कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडीओ बनवला होता. त्यात हदगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बडीकर यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. नेवा येथील पोलिस पाटील बालाजी जाधव यांनी आज सकाळी आत्महत्या केल्याने गावात एकच खळबळ उडाली. माझ्या मृत्युला पोलीस उपनिरीक्षक बडीकर जबाबदार असल्याचा उल्लेख त्यांनी व्हिडीओत केला आहे. बडीकर यांनी माझ्यावर अन्याय करायला नको होता, मी त्या घटनेची माहिती देऊनही माहिती लपवली असा रिपोर्ट त्यांनी केला, असं मृत बालाजी जाधव व्हिडीओत म्हटले. 


दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेतली असता, 15 दिवसापूर्वी पेवा या गावात एकाचा खून झाला होता. जातीय वादातून हा खून झाल्याचे सांगण्यात येते, याच घटनेतील आरोपीबद्दल पोलीस पाटील बालाजी जाधव यांनी माहिती लपवली असा वरिष्ठ पोलिसांचा समज होता. त्यातून पोलीस उपनिरिक्षक बडीकर यांनी बालाजी जाधव यांना विचारणा केली होती. पण, आपल्यावर खोटा आरोप होत असल्यानेच त्यांनी आत्महत्या केली असा आरोप आता होत आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणल्याचं पाहायला मिळालं. तसेच, संबंधित वरिष्ठ पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही ग्रामस्थांनी व बालाजी यांच्या कुटुंबीयांना केली आहे. मात्र, या घटनेमुळे पोलीस खात्यात आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.


हेही वाचा


मोठा ट्विस्ट! राहत फतह अली खान यांनीच अटकेचं वृत्त फेटाळलं; पाकिस्तानी गायकाने सत्य सांगितलं


गर्भपात करताना प्रेयसीचा मृत्यू, मृतदेहाची विल्हेवाट लावताना प्रेयसीच्या दोन्ही चिमुकल्यांनाही इंद्रायणीच्या प्रवाहात जीवंत फेकलं, पुणे हादरलं!