एक्स्प्लोर

Nanded Crime News: किरकोळ वादाचा भयानक शेवट, पाठलाग करून मिस्त्रीचा भर रस्त्यात काटा काढला, नांदेड पुन्हा हादरलं!

Nanded Crime News: नांदेड शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात थरारक शेवट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nanded Crime News: नांदेड (Nanded) शहरातील इंदिरा नगर परिसरात एका मिस्त्रीचा भररस्त्यात थरारक शेवट करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रताप गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव असून, किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकारामुळे नांदेडमधील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Nanded Crime News: नेमकी घटना काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रताप गायकवाड यांचा काही व्यक्तींशी किरकोळ वाद झाला होता. हा वाद मिटला असे वाटत असतानाच, प्रताप घरी जात असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. आपल्या मित्रांच्या मदतीने आरोपींनी प्रताप यांना वाटेत अडवले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Nanded Crime News: पोलिसांची कारवाई

घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तीन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार, हे कृत्य पूर्ववैमनस्यातून किंवा जुन्या वादातून घडल्याचे बोलले जात आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Nanded Crime News: पोलिसांसमोर मोठे आव्हान 

काही दिवसांपूर्वीच अर्जितसिंग चव्हाण यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. ही कारवाई ताजी असतानाच आता पुन्हा एकदा अशा प्रकारचे कृत्य घडल्याने गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नांदेडमध्ये सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

Ahilyanagar Crime News: राहातामध्येही धक्कादायक घटना 

अहिल्यानगरच्या राहाता शहरातील महात्मा फुले नगर परिसरात काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. नशेच्या अवस्थेत मुलगा सचिन खैरे याने वडील उत्तम खैरे यांच्या डोक्यात फरशी मारून त्यांचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले आहे. कुटुंबातील सततचे वाद, दारूचे व्यसन आणि मारहाणीचा त्रास यामुळे ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राहाता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा 

Ahilyanagar Crime News: 200 व्हिडीओ, 90 पेक्षा जास्त औषधं अन्...; संगमनेरचा भोंदूबाबा राजेंद्र गडगे अशोक खरातच्याही दोन पावलं पुढचा, तपासात हादरवणारी माहिती

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

FDA Actions News: तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; राज्यभरात कारवाईचं धाडसत्र, 2.23 कोटी किंमतीचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंच्या FDAचा भेसळखोरांना दणका; राज्यभरात कारवाईचं धाडसत्र, 2.23 कोटी किंमतीचा अन्नसाठा जप्त, 23 परवाने निलंबित
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
Maharashtra Live blog updates: 35 वर्षांनंतर काश्मीरमध्ये भारतात जन्मलेला एकही दहशतवादी शिल्लक उरलेला नाही: अमित शाह
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Private Hospital new Rule: खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
खासगी रुग्णालयांवर आता सरकारी नियंत्रण येणार, हिवाळी अधिवेशनात मोठ्या निर्णयाची शक्यता, रुग्णांना काय फायदा होणार?
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
Embed widget