नांदेड : रेतीची वाहतूक करणाऱ्या टिपरने धडक दिल्याने दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे ही घटना घडली आहे. नवीन पवार, मोईन शेख असं मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


नांदेडमधील सगरोळी येथील नवीन पवार, मोईन शेख हे युवक मोटरसायकलने गावातील बस्थानकाकडे जात होते. त्याचवेळी रेती घाटातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिपरने या मोटारसायकला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात नवीन पवार आणि मोईन शेख हे युवक जागीच ठार झाले. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.


सध्या नांदेडच्या बिलोली तालुक्यात अवैध रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रात्रंदिवस रेतीची वाहतूक सुरू आहे. प्रशासन मात्र या अवैध रेती उपशाकडे दुर्लक्ष करत आहे. या अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिपरनेमुळेच या युवकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिांनी केला आहे. 


भंडाऱ्यात उभ्या ट्रकवर भरधाव ट्रक आदळला, चेंदामेंदा झालेल्या ट्रकच्या कॅबिनमध्ये फसून चालक गंभीर


भंडाऱ्यात कोळशाची वाहतूक करणारा ट्रक राष्ट्रीय महामार्गालगत उभा असताना पाठीमागून भरधाव आलेल्या सिमेंटची वाहतूक करणाऱ्या ट्रकनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सिमेंटच्या वाहतुकीच्या ट्रकच्या केबीनचा पूर्णतः चुराडा झाल्यानं त्यात अडकून चालक गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात भंडारा - रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील सालई -उसरा गावाजवळ घडला. 


तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर जखमी चालकाला बाहेर काढून त्याला उपचारासाठी तुमसर येथे दाखल करण्यात आलं. दरम्यान या अपघातामुळं राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तीन तासापर्यंत खोळंबून होती. अपघातग्रस्त ट्रकला दूर केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.


ही बातमी वाचा: