एक्स्प्लोर

सना खान यांच्या हत्या प्रकरणात नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा, पाहा काय झाले

नागपूर : सना खान यांच्या हत्या प्रकरणात आज नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.

नागपूर : सना खान यांच्या हत्या प्रकरणात आज नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. एका बाजूला मध्यप्रदेशचे आमदार संजय शर्मा यांनी नागपूर पोलिसांसमोर हजर राहून सना खान आणि त्यांच्या प्रकरणातील आरोपींशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला. दुसऱ्या बाजूला सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचा तपास भटकवण्यासाठी हनी ट्रॅपचा मुद्दामध्ये आणला जात असल्याचा आरोप केला आहे.

सना खान, भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या 34 वर्षीय कार्यकर्त्या होत्यात. त्यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले, तरी त्यांचा मृतदेह मिळालेला नाही. सना खान यांच्या बाबतीत नेमके काय झाले?  याचे उत्तरही नागपूर पोलीस देऊ शकलेलं नाही. याप्रकरणी आजवर सना खान यांचे कथित पती अमित साहू, अमितचे मित्र राजेश सिंह, धर्मेंद्र यादव, रविशंकर यादव आणि कमलेश पटेल अशा पाच आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. याच आरोपींशी जुना संबंध असल्याच्या संशयावरून आज मध्य प्रदेशातील तेंदूखेडा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी नागपुरात बोलावण्यात आले होते. नागपूरच्या डीसीपी झोन 2 कार्यालयात तब्बल सव्वा दोन तास संजय शर्मा यांची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांची सना हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी अमित साहू आणि रविशंकर यादव याच्या समोरासमोर बसून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर आमदार संजय शर्मा यांनी या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही. आरोपी अमित साहू कधी काळी आपल्याकडे कामावर होता... मात्र, गेले पाच ते सात वर्ष तो आपल्या संपर्कात नाही असा दावा केला.

दुसऱ्या बाजूला पोलिसांनी सना हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने काही गोष्टी आपापसात जोडणे आवश्यक आहे, तेच पोलीस करत असून आमदार संजय शर्मा यांना त्याच उद्दिष्टाने बोलावल्याचा दावा नागपूर पोलिसांनी केला आहे. आमदार शर्मा यांनी सहकार्य केले असून लवकरच या प्रकरणांमध्ये काही ठोस माहिती समोर येईल, असा दावा ही पोलिसांनी केला आहे.

दरम्यान डीसीपी कार्यालयात आमदार संजय शर्मा यांची चौकशी सुरू असताना सना खान यांच्या आई सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या. कोणीही कितीही मोठा खासदार आमदार असला तरी या प्रकरणात वाचणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान सना खान हत्याप्रकरणाचा हनी ट्रॅप अशी काहीही संबंध नाही हत्या प्रकरणाचा तपास भटकवण्यासाठीच हनी ट्रॅप ची फोडणी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Embed widget