Nagpur News नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नागपूरच्या पारडी उड्डाण पुलावर (Nagpur Flyover Accident) आज दुपारच्या सुमारास ही घटना घडलीय. यात एक बाईकस्वार तरुण चिखलीवरून पारडीच्या दिशेने जात असताना तीव्र गतीमुळे त्या तरुणाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाण पुलाखाली कोसळलाय. सुमारे 50 फूट उंचावरून खाली पडल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचार दरम्यान या तरुणाला मृत झाल्याचे घोषीत केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र नागपुरात पुन्हा घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.


उड्डाण पुलावरून खाली कोसळून दुचाकी स्वाराचा मृत्यू 


नागपूर शहरात गेल्या 17 जून पासून ते 8 जुलै म्हणजेच 24 दिवसांच्या कालावधीत 8 भीषण हिट अँड रन अपघाताच्या घटना घडल्या आहे. तर 8 जुलैनंतर गेल्या 48 तासांत दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये 6 जणांनी प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न नागपूरकरांना पडला असतांना दुसरीकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरुन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलिसांना खडे बोल देखील सुनावले आहेत. नागपूरचे वाहतूक पोलीस उपायुक्त निष्क्रिय असून नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेत तातडीने सुधारणा झाली नाही, तर राज्य सरकारला त्यांची बदली करण्याचे आदेश जारी करू. अशा कठोर शब्दात न्यायालयाने वाहतूक व्यवस्थे संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व प्रकरण ताजे असताना आता शहरात आणखी एक अपघाताची घटना घडली आहे. 


कमी उंचीच्या संरक्षण भिंती मृत्यूचे कारण ठरताय का?


नागपूरच्या पारडी उड्डाण पुलावर आज दुपारच्या सुमारास एक बाईकस्वार जात असताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची दुचाकी उड्डाणपुलाच्या भिंतीला धडकली. ही धडक इतकी भीषण होती की या धडकेमुळे दुचाकी पुलावर राहिली, मात्र तो तरुण उड्डाण पुलाखाली कोसळला. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांनी जखमी तरुणाला उचलून जवळच्या भवानी रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरानी त्याला तपासून मृत घोषीत केले आहे. विशेष म्हणजे यापूर्वीही नागपूरच्या सक्करदरा तसेच सीताबर्डीच्या उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक दुचाकी स्वरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. त्यामुळे नागपूरच्या उड्डाणपुलावरील कमी उंचीच्या संरक्षण भिंती दुचाकी स्वरांसाठी धोकादायक बनल्या असून त्या मृत्यूचे कारण ठरत आहे का? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित केला जात आहे.    


इतर महत्त्वाच्या बातम्या