Nagpur News नागपूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत असलेल्या हिट अँड रनच्या (Hit And Run) घटनांनी संपूर्ण राज्य हादरुन गेलं आहे. पुणे पोर्शे कार अपघातानंतर (Pune Porsche Accident) लगेचच मुंबईतील वरळी हिट अँड रनच्या (Worli Hit And Run Accident) घटनांनी काळजाचा ठोका चुकवला आहे. अशातच नागपुर (Nagpur), नाशिक सारख्या शहरांमध्येही या अपघातांच्या मालिकेने सर्वांना हादरवून सोडलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकट्या नागपूर शहरात गेल्या 17 जून पासून ते 8 जुलै म्हणजेच 24 दिवसांच्या कालावधीत 8 भीषण हिट अँड रन अपघाताच्या घटना घडल्या आहे. तर गेल्या 48 तासांत दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये 6 जणांनी प्राण गमवावे लागले आहे. त्यामुळे राज्याच्या उपराजधानीत नेमकं चाललंय तरी काय? असा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे.


उपराजधानीत 48 तासांत 6 जणांनी गमावले प्राण


नागपूरात मंगळवार 9 जुलै रोजी दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या घटना पुढे आल्या आहेत. ज्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, ज्यात भावेश भरणे या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरुण दुचाकीनं जात असताना ट्रकनं धडक दिल्यानं त्याचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालक पळून गेलाय. तर दुसरी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. प्रकाश महंत हा भांडेवाडी परिसरातून तरुण पाई जात असताना अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली,  त्यात त्याचा मृत्यू झालाय. गेल्या 48 तासांत झालेल्या वेगवेगळ्या अपघातात एकूण 6 नगरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मृत्यू झालेले पाचजण हे 30 वयोगटाच्या खालचे आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे पाठोपाठ नागपूर देखील हिट अँड रनच्या घटनांनी हादरलं असल्याचे चित्र आहे. 


नागपूरात हिट अँड रन अपघातांचे सत्र 


नागपूर शहरात गेल्या 17 जून पासून ते 8 जुलै म्हणजेच अवघ्या 24 दिवसांच्या कालावधीत 8 भीषण हिट अँड रन अपघाताच्या घटना घडल्या आहे. तर गेल्या 48 तासांत दोन वेगवेगळ्या हिट अँड रनच्या घटनांमध्ये 6 जणांनी प्राण गमवावे लागले आहे. यातील अपघातांच्या घटना खालील प्रमाणे आहेत.  


17 जून ला वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणाच्या एका कार ने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडले त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. यात एका चिमुकलीची देखील समावेश होता.


त्यानंतर 30 जून रोजी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत क्रिकेट खेळायला जाणाऱ्या दोन तरुणांना ट्रक ने धडक दिली होती. ही धडक इतकी जोरदार होती की यात एकाचा मृत्यू झाला होता. तर एक गंभीर जखमी झाला होता.


ही घटना ताजी असताना लगेचच 1 जुलै रोजी बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाह सोहळ्याला जाणाऱ्या तरुणाला कार ने धडक दिली ज्यात त्याचा मृत्यू झाला.


त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 4 जुलैला वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही अशीच एक घटना घडली. ज्यात एका तरुणाला ट्र्क ने धडक दिली.


7 जुलैला गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघात दिनेश खैरनार या तरुणाच्या कार ने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. 


तर त्यांच दिवशी 7 जुलैला हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत साठ वर्षीय रत्नाकर दीक्षित यांना स्कुल बस धडक देऊन पळून गेला. या अपघातात रत्नाकर दीक्षित यांचा मृत्यू झाला.


त्यानंतर लगेचच 8 जुलैला कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अपघाताची घटना घडली, ज्यात भावेश भरणे हा तरुण दुचाकीने जात असतांना ट्रकने धडक दिल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. तर अपघातानंतर ट्र्क चालक पळून गेला.


याच दिवशी 8 जुलैला  वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकाश महंत हा  भांडेवाडी परिसरातून तरुण पाई जात असतांना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली त्यात त्याचा देखील मृत्यू झाला.


ही बातमी वाचा: