एक्स्प्लोर

Nagpur Police : स्टेशनमधील माहिती पत्रकारांपर्यंत कशी पोहोचली? अधिकाऱ्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, तक्रारीनंतर कॉन्स्टेबल बेपत्ता

Nagpur Police Missing : नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. संबंधित कर्मचारी हा 24 तासांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे.

Nagpur News : नागपूरच्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये (Nagpur Cyber Police Station) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस स्टेशनमधील माहिती बाहेर कशी गेली, यावरून एका पोलीस कर्मचाऱ्याला अधिकाऱ्यांकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलातच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित पोलीस कर्मचारी गेल्या 24 तासांपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. प्रफुल्ल ठाकरे असं या कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे.

Nagpur Police Assault Allegation : माहिती लीक प्रकरणावरून वाद

पोलीस स्टेशनमधील कारवाईची माहिती पत्रकारांपर्यंत कशी पोहोचली, यावरून अधिकाऱ्याने पोलीस कर्मचारी प्रफुल्ल ठाकरे यांची विचारणा केली. याच कारणावरून त्यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली आणि मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Nagpur Missing Constable : तक्रारीनंतरच बेपत्ता

मारहाण आणि अपमान झाल्याची तक्रार घेऊन प्रफुल्ल ठाकरे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले होते. मात्र त्यांना न्याय न मिळाल्याने ते कालपासून बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळालं आहे.

Missing Constable Family Allegation : कुटुंबीयांचा गंभीर आरोप

प्रफुल्ल ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी सायबर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. काही अधिकारी स्वतःच्या चुका झाकण्यासाठी प्रफुल्ल यांना त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमच्या मुलाचा शोध घ्या, काहीही अनुचित घडलं तर जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Nagpur Police Response : अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

या प्रकरणी आरोप झालेले पोलीस अधिकारी विजय राणे यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला. त्यांनी प्रफुल्ल ठाकरे यांना पोलीस स्टेशनमधील माहिती पत्रकारांपर्यंत कशी काय गेली याची विचारणा केल्याची कबुली दिली. मात्र या प्रकरणी कोणतीही मारहाण झाली असल्याचा आरोप पोलीस अधिकारी विजय राणे यांनी फेटाळला आहे.

Nagpur Public Concern : पोलीस ठाण्यातच सुरक्षा प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर पोलीसच पोलीस ठाण्यात सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रफुल्ल ठाकरे यांच्या आई-वडिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून त्यांच्या मुलाचा शोध घ्यावा, अशी विनंती केली आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Gunda Act: कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
कोलकात्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंसाचार; मुख्यमंत्री सुवेंदू अधिकाऱ्यांकडून मोठं पाऊल, बंगालमध्ये पहिल्यांदाच 'गुंडा कायदा' लागू
Akola Crime News: भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
भाड्याने राहणाऱ्या पोलिसाने घरमालकाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचं अमिष दाखवलं; नको ते केलं अन्..., अकोल्यातील तरुणीचा मृत्यू
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Embed widget