Nagpur News नागपूर नुकताच एका धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतानाचा (Video Viral) एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, त्यानंतर लगेचच आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला, ज्यामध्ये चालत्या दुचाकीवर प्रेयसीसोबत अश्लील कृत्य (Nagpur News) करणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा तो व्हिडीओ समाजमध्यमांवर व्हायरल झाला होता. हे प्रकरण ताजे असताना यात अधिक भर घालणार आणखी एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे.


दारूच्या नशेमध्ये (Drunk Couple) चूर असलेला तरुण तरुणीला उचलून नेताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र प्रियकर आपल्या प्रेयसीला उचलून नेत असताना त्याचा तोल जाऊन तोही जमिनीवर आदळतो, असं या व्हायरल व्हिडीओ  मध्ये दिसत आहे. नागपुरातील बजाज नगर पोलीस स्टेशनला हद्दीतील हा व्हिडीओ आहे. त्यामुळे सातत्याने समोर येणारे प्रकार बघता राज्याच्या उपराजधानी नागपुरात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल आता नागपूरकर विचारू लागले आहे.   


 उपराजधानीत चाललंय तरी काय?


राज्याची उपराजधानी नागपूरात नशेखोरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक तरुणी नशेमुळे रस्त्यावर चालू ही शकत नाही आहे. त्यामुळे एक तरुण तिला सांभाळतो आणि उचलून घेऊन जातो आणि स्वतःही तोल जाऊन खाली पडतो, असं या व्हिडीओ मध्ये दिसून येत आहे. नागपुरातील बजाज नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये  दिसत असलेली तरुणी कुठल्या तरी नशेत असल्याचा कयास लावला जात असून तिचा मित्र तरुणीला सांभाळताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमकं केव्हाचे आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल (viral) होत आहे.


पोलिसांकडून पुढील तपास सुरू 


बजाज नगर पोलिसांनी व्हिडिओ समोर आल्यानंतर तरुण-तरुणीच्या पोशाखावरून त्या संदर्भात एका खाजगी कॉलेजला विचारणा केली असून त्यांच्या कडून अजून कुठलीही माहिती उपलब्ध झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे गेल्या आठवड्याभरात प्रेमी युगलांचे अश्लील चाळे करणारे कार आणि दुचाकी वरील व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एक घटना पुढे आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या