Nagpur Crime: राज्याच्या उपराजधानी नागपुरात धावत्या कारमध्ये प्रेयसीसोबत अश्लील चाळे करतानाचा (Video viral) व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नागपूरमध्ये एक संतापजनक व्हिडिओ समोर आलाय. चालत्या दुचाकीवर प्रेयसीसोबत अश्लील कृत्य (Nagpur news) करणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दुचाकीवर अश्लील चाळे करत पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या गुंडावर गुन्हा दाखल केला आहे.
कारनंतर आता दुचाकीवर अश्लील चाळे करत असल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत नागपुरात काही दिवसांपूर्वी कारमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या जोडप्याचा व्हिडीओ समोर आला होता.
दुचाकीवर गुंडाचा अश्लील प्रकार समोर
दुचाकी अश्लील चाळे करणाऱ्या गुंडाचे नाव हर्ष उर्फ बिल्ली कहर असे आहे. तो कुख्यात गुंड असून काही दिवसांपूर्वी तो दुचाकीच्या पेट्रोल टॅंकवर बसून प्रेयसी सोबत अशशील चाळे करत पोलिसांच्या ठाणाच्या हद्दीत दुचाकीवर फिरला. काहींनी त्याचा तोच व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर पोलिसांनी त्याच मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचा शोध घेतला असता तो सीसीटीव्हीमध्ये सोबतच्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही नागपुरात कारमध्ये अश्लील चाळे करत ड्रायव्हिंग करत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्याच्या एका आठवडानंतर आता दुचाकीवर तसाच प्रकार करणाऱ्या एका कुख्यात गुंडाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा तरुण कुख्यात गुंड असून दुचाकीवरचा व्हिडीओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ तपासत या गुंडावर गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले.
प्रेयसीसोबत ड्रायव्हिंग सीटवर बसून रोमांस पडला महागात
अपघातांच्या घटनांमध्ये सतात्याने वाढ होत असताना उपराजधानी नागपुरात (Nagpur News) एका धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात धावत्या कारमध्ये चालक तरुण आपल्या प्रेयसीसोबत चक्क ड्रायविंग सीटवर बसून अश्लील चाळे (Couple Car Romance) करताना आढळून आला आहे. हा व्हिडिओ सध्या समाजमाध्यामवर तूफान वायरल (Viral Video) होत असून सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार नागपूरच्या धरमपेठ भागातील हि घटना असून या प्रकरणी आता पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारला आहे.
नागपूरच्या रस्त्यावर खुल्लम खुल्ला अश्लील चाळे!
या संदर्भात आता सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक आणि त्याच्या प्रेयसीची ओळख पटवित त्यांना पालकासह चौकशीसाठी पोलीस ठाण्यातही बोलावले आहे. व्हिडिओ मधील संशयित आरोपी सूरज राजकुमार सोनी (वय 28, रा. मानकापूर) हा सनदी लेखापाल आहे. तर त्याची प्रेयसी अभियंता असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघे शंकर नगर ते लक्ष्मी नगर चौकातून चारचाकीने जात असताना प्रेयसीने अश्लील चाळे सुरु केले. दरम्यान हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य लोक पाहत असून ते व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे, यांचे पण भान या प्रेमी युगलांना नव्हते. त्यामुळे नागपूरच्या रस्त्यावर खुल्लम खुल्ला प्यार सुरू असल्याचा प्रकार नव्याने समोर आला आहे.
हेही वाचा: