नागपूर : बलात्काराच्या गुन्ह्यात (Nagpur Crime) कारागृहातून जामिनावर सुटताच एका तरुणाने आपल्या जुन्या प्रेयसीला कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या (Nagpur Police)हद्दीतील टीव्ही टॉवर ते आयबीएम मार्गावर सोमवारी 12 फेब्रुवारीच्या सायंकाळी घडली. राज ऊर्फ राघवेंद्र राधेश्याम यादव (वय 31, रा. ऐश्वर्य रेसिडेन्सी, वासुदेवनगर, गिट्टीखदान), असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 307 नुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
बालात्काराच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटताच केलं कृत्य
सोशल मिडियाच्या माध्यमातून मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या 23 वर्षीय तरुणीची प्रकरणातील संशयित आरोपी राजसोबत ओळख झाली होती. दरम्यान त्याच्यात अधिक जवळीक निर्माण झाली. त्यानंतर राजने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र लग्नाचा विषय काढताच तो कायम टाळाटाळ करत होता.
दारम्याने राजने 2021 मध्ये अन्य तरुणीसोबत लग्न करून ही बाब पीडित तरुणीपासून लपवून ठेवली होती. मात्र कालांतराने तरुणीला याबाबत माहिती पडले असता तिला जबर धक्क बसला. त्यानंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार नोंदवली. त्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी आरोपीविरुद्ध 5 डिसेंबर 2023 ला गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात आरोपी राज तुरुंगात देखील गेला होता. मात्र त्यानंतर देखील त्याच्या मनात राग होता.
तक्रारदार तरुणीला कारखाली चिरडण्याचा प्रयत्न
नुकातच जानेवारी महिन्यात राज जामिनावर बाहेर आला. बाहेर येताच त्याने पीडित तरुणीचा शोध सुरू केला आणि या शोधत असतांना त्याने सोमवारी, 12 फेब्रुवारीच्या सायंकाळी साडे सात ते आठच्या सुमारास युवतीला गाठले. यावेळी पीडित युवती तिच्या मोपेडने तेलंगखेडी हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होती. मात्र राज तेथे दिसताच तरुणी आपल्या घराकडे निघाली. दरम्यान, गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत टीव्ही टॉवर चौकाकडून आयबीएम रोडच्या उतारात संशयित आरोपी राजने त्याची एक्सयुव्ही 500 कार क्रमांक एम. एच.31, एफ. ए-5269 ने तीचा पाठलाग सुरू केला.
दरम्यान या रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवत तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने मोपेडला मागून जोरात धडक दिली. त्यानंतर तरुणी ख़ाली पडल्यामुळे तिच्या हातापायाला, कंबरेला जबर मार लागून ती जखमी झाली. हे सगळे बघून राजने तेथून पळ काढला. यात तिच्या मोपेडचे देखील नुकसान झाले. नागरिकांनी तिला रस्त्याच्या बाजूला केले. त्यानंतर तरुणीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली असता गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राजविरुद्ध कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या