Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडीओ एका 3 वर्षाच्या मुलाचा आहे. 3 वर्षांच्या वयात मुलांना नीट चालताही येत नाही, अशा वयात क्रिकेटच्या मैदानावर बॅट हातात घेऊन एक मूल अप्रतिम शॉट्स खेळताना दिसत आहे. या मुलाला कोणी ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल म्हणतंय, तर कोणी भारताचा सूर्यकुमार यादव तर कोणी दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स यांच्याशी त्या मुलाची तुलना केली जातेय. व्हायरल झालेला व्हिडीओ हा ऑस्ट्रेलियातील लहान मुलाचा आहे. 




इंस्टाग्रामपासून ते ट्विटरवर लहान मुलाचा व्हिडिओ खूप व्हायरल


ज्या वयात मुलं नीट चालत नाहीत, त्या वयात या मुलानं बॅटने जोरदार फटके मारल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.   सोशल मीडियावर या मुलाची खूप चर्चा होत आहे. कोणी त्याला लिटल ग्लेन मॅक्सवेल म्हणत आहेत तर कोणी त्याला सूर्यकुमार यादव म्हणत आहे. इंस्टाग्रामपासून ते ट्विटरवर लहान मुलाचा व्हिडिओ खूप लोकप्रिय होत आहे. हा लहान मुलगा डोळ्याचे पारणे फेडतानाचे स्वीप, पुल आणि हुक शॉट्स खेळताना दिसत आहे. इतकंच नाही तर तो धावताना डुबकीही घेत आहे. व्हिडिओ पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की तो भविष्यात कोणत्या स्तराचा फलंदाज बनू शकतो. जर तो आयपीएलमध्ये आला तर तो सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू होईल, असे काहींना वाटते. मात्र, केवळ वेळच सांगेल, परंतु सध्या तो आपल्या शॉट्सने सर्वांना वेड लावत आहे.






 


अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियन होण्याची भारताची संधी हुकली


ऑस्ट्रेलियाने नुकताच भारतीय संघाचा पराभव करुन अंडर-19 विश्वचषक 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. अशातच हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, कर्णधार उदय सहारनच्या नेतृत्वाखालील अंडर-19 विश्वचषक संघाची वर्ल्ड चॅम्पियन होण्याची संधी हुकली आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधील मोठ्या भारतीय संघाप्रमाणे सहारनच्या नेतृत्वाखालील संघानेही या स्पर्धेत एकही सामना गमावला नाही, मात्र अंतिम फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, याआधी पॅट कमिन्सच्या संघाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर टीम इंडियाचा पराभव करून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. टीम इंडियाला आपल्या घरच्या मैदानावर वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी होती, पण तसे झाले नाही.


महत्वाच्या बातम्या:


तिसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडच्या प्लेईंग 11 ची घोषणा, एका बदलासह उतरणार मैदानात