Nagpur Crime News नागपूर  : नागपूर शहरात (Nagpur) एका ओयो हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार(Sex Racket) करवून घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही खळबळजनक घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज ओयो हॉटेल येथे घडली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हेशाखा युनिट 4 च्या पथकाने  (Nagpur Crime News) अचानक धाड घालून ही कारवाई केली आहे.


याप्रकरणी बापलेकासह पाच जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर अल्पवयीन मुलींची या जाळ्यातून सुटका करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी पुन्हा प्रकरण उघडकीस आणल्याने शहरात इतरत्र देखील असेच आणखी काही देहव्यापाराचे अड्डा सुरू असल्याची शक्यता बाळवली आहे. 


अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार


मुंबई पुण्यानंतर आता नागपूरात सुद्धा देहव्यापाराचे लोन पसरत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही काळात नागपूर पोलिसांनी स्पा आणि सलूनच्या आड सुरू असलेल्या देहव्यापाऱ्याच्या अड्ड्याचा पर्दाफाश केल्याच्या अनेक घटना उघडकीस आणल्या आहे. त्यानंतर आता या देहव्यापाराचे अड्डे चालवणाऱ्यांनी आपला मोर्चा शहरातील मोठमोठ्या हॉटेल्सकडे वळवला असल्याचे चित्र आहे. अशीच एक देहव्यापाराचा व्यवसाय चलवणाऱ्या बापलेकासह पाच जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. मनीष नगरातील रेल्वे क्रॉसिंगजवळील ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.


ज्यामध्ये हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (55) आणि आशिष चावला (27) (रा. छत्रपती चौक) अशी संशयित आरोपी बापलेकांची नावे आहेत. तर अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी ठेवलेल्या व्यवस्थापक धीरज खुळे(रा. राकेश लेआऊट, बेलतरोडी), गजानन सोनवणे (40 रा. अमर संजय सोसायटी, मनीषनगर) आणि अलोक रैकवार (34 रा. रमानगर, अजनी) या इतर तिघांची नावे आहेत.


बापलेकासह पाच जणांवर गुन्हा 


बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे सुरु असून शहरातील आंबटशौकीन ग्राहकांसाठी या ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींनाआणण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती आहे. पैशांची गरज असलेल्या आणि परिस्थिती पुढे हतबल असलेल्या मुलींना पैशांचे आमिष दाखवून या जाळ्यात फसवण्यात येतं. अशातच संशयित आरोपीने अल्पवयीन मुलींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना देहव्यापारासाठी प्रवृत्त केलं. त्यानंतर ते ग्राहकांना अल्पवयीन मुली पुरवीत होते. तसेच ग्राहकांच्या ओळखपत्राची शहानिशा न करता तसेच रजिस्टरमध्ये कुठलीही नोंदणी न करता हॉटेलच्या खोल्या उपलब्ध करून देत होते. गुन्हे शाखेच्या युनिट 4 ला सोमवारी दुपारच्या दरम्यान ही गुप्त माहिती प्राप्त झाली.


दरम्यान पोलीस पेट्रोलिंग असतांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने कृष्णकुंज हॉटेलमध्ये धाड टाकली. त्यानंतर घटनास्थळी संशयित आरोपी अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करवून घेताना रंगेहाथ सापडले. त्यांच्या ताब्यातून एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. संशयित आरोपींविरुद्ध बेलतरोडी ठाण्यात कलम 370, 370 (अ), 34, सहकलम 3, 4, 5, 7, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956, सहकलम 4, 8, 12 पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोबतच त्यांच्या ताब्यातून रोख 5  हजार रुपये नगद, पाच मोबाइल, मोटारसायकल आणि  इतर साहित्य असा एकूण 85 हजार  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक निरीक्षक अयुब संदे, अविनाश जायभाये यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या