एक्स्प्लोर

Nagpur Crime : पत्नीबद्दल टिप्पणी; मोठ्या भावाकडून लहान भावाची हत्या

2008 मध्ये ही दोघांनी भांडणात एकमेकांचा हात मोडला होता. तर 2017 मध्ये ही दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ले केले असल्याने दोघांवरही पोलिस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत.

नागपूरः मोठ्या भावाने आपल्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या छोट्या भावाच्या डोक्यावर जड वस्तूने वार करुन लहान भावाची हत्या केली. नागपुरातील वाठोडा पोलिस ठाण्याअंतर्गत श्रावण नगर परिसरात ही घटना घडली. चंद्रकांत पौनीकर (वय 30) असे हत्या झालेल्या तीस वर्षीय तरुणाचे नाव आहे. रोशन पौनीकर याला आपल्या भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.

चंद्रकांत आणि रोशन दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते. ते श्रावणनगर परिसरात आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. अनेक वर्षांपासून दोघांमध्ये सतत भांडण व्हायचे. मात्र मंगळवारी झालेल्या भांडणाचा अंत एका भावाच्या मृत्यूने झाला. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी रात्री  दारूच्या नशेत चंद्रकांत ने रोशनच्या पत्नी संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी केली. कौटुंबिक वादातून रोशनची पत्नी काही दिवसांपूर्वी त्याला सोडून निघून गेली होती. भांडणात चंद्रकांत ने 'तू आपल्या पत्नीला सांभाळू शकला नाही, आम्हाला काय सांभाळणार' असे म्हटले. त्यामुळे आधीच पत्नी सोडून गेल्यामुळे नैराश्यात असलेल्या रोशन ने रागाच्या भरात लहान भाऊ चंद्रकांतला शिवीगाळ करणे सुरू केले.

शाब्दिक भांडण मारामारी पर्यंत

काही वेळाने दोघांचे शाब्दिक भांडण मारामारी पर्यंत गेले. दोघांच्या भांडणाचा आवाज शेजाऱ्यांपर्यंत ही पोहोचला. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली.  मात्र, पोलीस पोहोचण्याच्या आधीच दोघांच्या भांडणाचा आवाज शांत झाला होता. थोड्याच वेळानंतर रोशनच्या आईने बाहेर येऊन मोठ्या भावाने लहान भावाची डोक्यावर जड वस्तूचा प्रहार करून हत्या केल्याची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चंद्रकांतला रुग्णालयात दाखल असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. भावाच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी रोशन पौनीकरला अटक केली आहे. 

दोन्ही भावांचा भांडणाचा पूर्व इतिहास

विशेष म्हणजे दोन्ही भावांमध्ये भांडण होण्याचा अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे. 2008 मध्ये ही दोघांनी भांडणात एकमेकांचा हात मोडला होता. तर 2017 मध्ये ही दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ले केले असल्याने दोघांवरही पोलिस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Jalna Weather Station Tampering : जालन्यात 40 स्वयंचलित हवामान केंद्रांत छेडछाड, पर्जन्यमापकावर बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप
जालन्यात 40 स्वयंचलित हवामान केंद्रांत छेडछाड, पर्जन्यमापकावर बर्फ ठेवून पावसाच्या खोट्या नोंदी, शेतकऱ्यांमध्ये संताप
धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल
धक्कादायक! बेकरीतील केकमध्ये आढळली उंदराची विष्ठा, अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी बदलापुरात दाखल
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
नगरसेवक रमेश म्हात्रेची न्यायालयात विनवणी, हायकोर्टाने खडेबोल सुनावले; वकिलांनाही कडक शब्दात सवाल, नेमकं काय झालं?
Maharashtra Cyber Action : महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
महाराष्ट्र सायबरची धडक कारवाई! CJP आंदोलनादरम्यान सीमेपलीकडून चालणारे 500 हून अधिक प्रोफाइल रडारवर
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
गणपती आले... मध्य रेल्वेकडून 246 गणपती विशेष गाड्यांची घोषणा; CSMT वरुन 98 तर पुण्यातून 10 विशेष गाड्या
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
फुटीर खासदाराकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर पोस्ट डिलिट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Ambergris Seized : तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
तब्बल 4 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त, अलिबाग पोलिसांची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
20 हजारांची लाच मागितली, वन विभागातील दोन अधिकाऱ्यांसह मध्यस्थीलाही अटक; एसीबीची धडक कारवाई
NEET Paper Leak: नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिल्या सुनावणीत काय घडलं? सुनावणी थेट 3 ऑगस्टला होणार,नेमकं कारण काय?
नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील फास्ट ट्रॅक कोर्टातील पहिली सुनावणी लांबणीवर, नेमकं कारण काय?
Embed widget