एक्स्प्लोर

मित्राच्या गळ्यातील दीड तोळ्याच्या सोनसाखळीसाठी केली हत्या, हत्येप्रकरणी दोघे मित्र ताब्यात

सोहमच्या हत्येच्या 3 ते 4 दिवसापूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी मधील लॉकेट विकून मैज मजा केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे

मुंबई : 14 वर्षीय मित्राला दोघा मित्रांनी  बहाण्याने एका इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने विरोध केल्याने त्या दोघांनी त्याची गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याचा बंद फ्लॅटमधील एका सोफ्यामध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहम बाजागे असे मृतक अल्पवीयन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (24) आणि त्याचा अल्पवीयन साथीदार अशी आरोपीचे नावे आहेत. 

मृतक सोहम हा कल्याण - पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगर मधील साईराम रेसिडेन्सी येथील इमारतीत कुटुंबासह राहत होता. काल दुपारच्या सुमारास आरोपींनी मृतक सोहमला मोर दाखवण्याच्या बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असतानाच मृतक सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आवळून हत्या करून त्याच्या गळ्यातील दीड तोळ्यांची सोनसाखळी काढली.  त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघांनाही  मृतकची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे 10 हजार रुपयात गहाण ठेवून त्यामधून मिळालेल्या पैशातून आरोपीने उसने पैसे फेडणार होता तर उरलेल्या पैशातून मौजमजा करणार असल्याची माहिती मिळाली आहे. 

काल दुपारपासून सोहम बेपत्ता असल्याची माहिती  त्याच्या कुटुंबासह तो राहत असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सायंकाळपासून त्याचा  कुटुंबाने शोध केला. खळबळजनक बाब म्हणजे आपल्यावर संशय येऊ नये म्हणून  या आरोपींनीही कुटुंबासोबत फिरून त्याचा  शोध घेत होते. अखेर रात्रीच्या सुमारास एका बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सोफ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनतर घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करून सोहमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. त्यावेळी नातेवाईकांने दिलेल्या माहिती व संशयातून सोहमच्या दोघा मित्रांना ताब्यात घेतले आहे. 

सोहमच्या हत्येच्या 3 ते 4 दिवसापूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी मधील लॉकेट विकून मैज मजा केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर केवळ मैजमजा करण्यासाठी अल्पवयीन मित्राची हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली असून अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.  

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Police Threats Students : खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
खिशात अमली पदार्थ ठेवून आत टाकण्याची भाषा; त्याच पोलिसाला गृहखात्याचा मोठा दणका, विद्यार्थ्याला धमकी देणाऱ्या पोलिसाची बदली
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
Jalgaon Crime News: कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ
कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Embed widget