एक्स्प्लोर

माता न तूं वैरिणी! प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा खून

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका आईनेच आपल्या पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचं उघडकीस आलंय.

जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आज एक खळबळजनक घटना उघडकीस आली. एका आईनेच आपल्या पोटच्या मुलाची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचं उघडकीस आलंय. प्रियकराच्या मदतीने आपल्याच 6 वर्षांच्या मुलाचा अपहरणाचा बनाव करून हत्या केल्याचं समोर आल्याने पोलीसही सुन्न झालेत.

अंबड तालुक्यातील डावरगाव येथील महिला शीतल उघडे ही काल आपल्या भावाला रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली. तिच्याजवळ एक सहा वर्षांचा मुलगा होता. उपचारानंतर मेडिकल आणण्यासाठी म्हणून रुग्णालयाबाहेर आली. परंतु, सोबत असलेला सहा वर्षाचा मुलगा आदित्य याला कुठेतरी थांबवण्याचा बहाणा करून तिने जवळच असलेल्या प्रियकराकडे मुलाला सोपवले. अर्थात हा प्रियकर अनोळखी असल्याचाही बनाव केला. सदर महिलेने आपला भाऊ तसेच आजूबाजूच्या लोकांची खात्री व्हावी यासाठी समोरचा प्रियकर अनोळखी असून मुलाला काही काळ त्याच्याजवळ ठेवताना त्याचा नंबर घेतल्याचा बहाणा देखील केला. थोड्याच वेळात ही महिला आणि तिचा भाऊ परत आल्यानंतर तिथे आपला मुलगा आणि ज्याच्या सांभाळी घातले होते तो व्यक्ती तिथे नसल्याचं लक्षात आलं. दरम्यान बराच शोधाशोध केल्याचं नाटक केल्यानंतर तिने अंबड पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून प्रियकराचा मोबाईलनंबर देखील दिला आणि इथेच पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.

पोलिसांकडे आलेल्या तक्रारीवरून आणि दिवसा घडलेल्या या अपहरण नाट्याने पोलीस देखील चक्रावून गेले. यातच रात्री उशिरा अंबड शहरापासून 6 किमी अंतरावरील घनसावंगी रोडवर एका लहान मुलाचा शेतात मृतदेह आढळुन आला, ज्याच्या तोंडात कापडी बोळा कोंबलेला दिसल्याने मुलाची हत्या झाल्याचे उघड झाले. पंचनामा झाल्यानंतर ज्या महिलनेने अपहरण केल्याची तक्रार दिली होती. तिचाच सहा वर्षांचा मुलगा आदित्य असल्याची खात्री झाली.

असा झाला खुनाचा उलगडा..
अपहरण झालेल्या मुलाची हत्या झाल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी रात्रीतून मुलाच्या आईने  दिलेल्या नंबरवरून पैठण येथील रहिवासी असलेला नवनाथ जगधनेला ताब्यात घेतलं. सदर आरोपीने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, फिर्यादी महिला आणि आरोपीच्या माहिती देण्यावरून पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच आरोपीने अपहरण झाल्याची मुलाची फिर्याद देणाऱ्या आईसोबतच आपले प्रेमसबंध असल्याने तसेच हा लहान मुलगा आपल्या प्रेमात अडसर होत असल्याच्या कारणाने हत्या केल्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी मयत आदित्यची आई असलेल्या शीतल उघडे हिला देखील अटक केलं. या प्रकरणात या दोघांना साथ देणारा सहआरोपी गणेश रोकडे यालाही अटक केलंय. या संपूर्ण घटनेची आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिल्याने या प्रकरणी अंबड पोलिसांनी या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय.

अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयावरून अटक करण्यात आलेले आरोपी नवनाथ जगधने आणि गणेश रोकडे यांनी लहानग्या आदित्यची हत्या करून त्याच्या मृतदेह घनसावंगी रोडवरील नाल्याजवळ फेकल्याची रात्री कबुली दिली. एकीकडे या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना लवकर यश आलं असलं तरी अपहरणाचा बनाव करून हत्या झालेल्या मुलाचा जीव वाचवण्यात पोलिसांना मात्र अपयश आलं. दरम्यान या घटनेची माहिती गावात आणि तालुक्यात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Goregaon Crime : खेळताना उचलले आणि डक्टमधून खाली ढकलले, गोरेगावात 12 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले
खेळताना उचलले आणि डक्टमधून खाली ढकलले, गोरेगावात 12 वर्षांच्या मुलीने 18 महिन्यांच्या चिमुकलीला 6 व्या मजल्यावरून फेकले
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget