Indian Overseas Bank Scam: इंडियन ओव्हरसीज बँकेतील 73 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (Central Bureau of Investigation) गेल्या आठवड्यात उद्योगपती विनोद जतीया (Businessman Vinod Jatiya) यांच्या घरावर छापा टाकला होता. याप्रकरणी सीबीआयने (CBI) विनोद जतीया, नीता जतीया, प्रतीक विनोद कुमार जतीया आणि अन्य यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयचे पथक व्यापारी विनोद जतीया (Businessman Vinod Jatiya)  यांच्या घरी पोहोचले आहे. 


बँकेने (Bank) केलेल्या आरोपानुसार, दिलशाद ट्रेडिंग कंपनीचे (Dilshad Trading Company) संचालक विनोद जतीया (Businessman Vinod Jatiya) आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेत (CBI) खोटी कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूक केली. त्यांनी बँकेला चुकीची कागदपत्रे दिली होती. या प्रकरणात सीबीआयच्या (CBI) सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपी कंपनीने कर्जदार आणि संबंधित संस्थांसोबत अनेक व्यवहार केले. मात्र याचे कोणतेही कागदपत्रे किंवा नोंद ठेवली नाही. छापेमारीत सीबीआयला आरोपीच्या घरातून आणि कार्यालयातून या प्रकरणाशी संबंधित अनेक कागदपत्रे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सीबीआयची (CBI)  (CBI) टीम या कागदपत्रांची तपासणी करत आहे. जतीया (Businessman Vinod Jatiya) रिअल इस्टेट (Real Estate Business) ग्रुपच्या खात्यात त्रुटी आढळून आली आहे. तसेच यात बोगस व्यवहार आणि बिले आढळून आली आहेत.


पुणे (Pune) आणि इंदूरच्या प्रकल्पांमध्ये गैरव्यवहार झाल्याची शक्यता


या घोटाळ्यात (Indian Overseas Bank Scam) पुणे (Mumbai) आणि नवी मुंबईतील (Mumbai) जातीय समूहांकडून उभारले जाणारे प्रकल्पही सीबीआयच्या रडारवर आहेत. येथेही गैरव्यवहार झाल्याचा संशय सीबीआयला आहे. या प्रकल्पांची सीबीआय चौकशी करत आहे. दरम्यान, इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank) सीबीआयला जतीया आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात पत्र लिहून मनी लाँड्रिंगची माहिती दिली होती. त्यात बँकेने लिहिले की, दिलेले पैसे बेकायदेशीरपणे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवले गेले. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये अनेक अनियमितता आढळून आल्या आहेत. खरेदी केलेल्या मालाची बिले किंवा कागदपत्रे कंपनीकडे नाहीत. सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: