PM Modis Foreign Visits Cost: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांच्या परदेश दौऱ्याची देशात तसेच जगभरात चर्चा होत असते. मग ते परदेशी शिखर परिषदेत सामील होण्यासाठी असो किंवा इतर देशांशी परस्पर संबंध दृढ करण्यासाठी. पंतप्रधान मोदींचा दौरा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता याशी संबंधित एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यात पंतप्रधानांच्या दौऱ्यावर झालेल्या खर्चाशी संबंधित सर्व तपशील जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधानांच्या प्रत्येक दौऱ्यावर किती खर्च झाला, याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन (Minister of State for External Affairs V. Muraleedharan) यांनी राज्यसभेत सार्वजनिक केली आहे.


How Much Was the Cost of Pm Modi's Foreign Visits : युरोप दौऱ्यावर 2.25 कोटी रुपये खर्च 


परराष्ट्र राज्यमंत्री मुरलीधरन (Minister of State for External Affairs V. Muraleedharan) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi ) यांनी 5 वर्षांत 36 परदेश दौरे केले आहेत. अलीकडेच पंतप्रधान मोदी (Pm Narendra Modi ) बाली दौऱ्यावर गेले होते. तेव्हा त्या दौऱ्यावर 32 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. याशिवाय पंतप्रधान 2022 च्या सुरुवातीला युरोप दौऱ्यावर (Pm Narendra Modi Europe Tour) होते. या दौऱ्यावर सुमारे अडीच कोटी रुपये खर्च करण्यात आले.


Pm Narendra Modi America Tour : अमेरिका दौऱ्यावर झाला सर्वाधिक खर्च


मुरलीधरन यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावर सर्वाधिक खर्च (PM Modis Foreign Visits Cost) झाला होता. 2019 मध्ये 21 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्याचा एकूण 23.27 कोटी रुपये खर्च आला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (External Affairs Minister S Jaishankar), एनएसए अजित डोवाल (Nsa Ajit Doval) यांच्यासह 9 जण होते. या प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनामुळे पंतप्रधानांनी (Pm Narendra Modi ) 15 नोव्हेंबर 2019 ते 26 मार्च 2021 पर्यंत कोणताही विदेश दौरा केला नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मी कॉपी करुन दहावी पास, चिटिंग करण्यात Ph.D, जीन्स घालून गेल्यानंतर मुली माझ्याकडे पाहायच्या; मंत्र्याने केली विद्यार्थ्यांसमोरच स्वत:ची पोलखोल