Mumbai Police News update : मुंबईत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वाहतुकीचे नियम मोडल्यावर एका वाहनचालकाची चौकशी करत असताना ही घटना घडली आहे. वाहतूक पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती वाहतूक पोलिसाला मारहाण करत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच पोलीस हवालदाराला मारहाण होत असताना तिथे मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी देखील जमलेली दिसत आहे. हा व्हिडीओ (Viral Video) आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेक लोक पोलिसाला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ (Viral Video) पाहून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. 


Mumbai Police: नेमकं काय आहे प्रकरण?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कुर्ला (पश्चिम) डेपो सिग्नल जवळ घडली आहे. खालीद इसाक वसईकर (वय 53) याने स्कूटर चालवत असताना सिग्नल तोडून पळून जात होता. मात्र त्याला वाहतूक हवालदारने पकडले आणि याबाबत चौकशी करत असताना खालीद याने त्यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ केली. त्यावेळी खालीद याने आरडाओरडा करून लोकांची गर्दी जमवली. यातच घटनास्थळी गर्दीतून इतर दोन अनोळखी व्यक्तींनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की केली आणि एकाने पोलीस हवालदाराच्या कानशिलात लगावत धमकी दिली. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद (Viral Video) झाला असून याप्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात कलम 353, 332, 504, 506, 34 भादवि प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Pune Police : पुण्यातही पोलिसाला मारहाण 


दरम्यान, पुण्यातही काही महिन्यांपूर्वी पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली होती. येथे कार्तिकी एकादशीसाठी बंदोबस्त करत असलेल्या महिला पोलिसांचा विनयभंग करुन मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. दोन दुचाकीस्वारांनी बंद करण्यात आलेल्या रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी महिला पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्याने वाद घालत होते. हा वाद टोकाला गेला आणि दोघांनी महिला पोलिसाच्या तोंडावर फटका मारला. या महिला पोलिसाला वाचवण्यासाठी गेलेल्या पोलिसांना देखील दोघांनी मारहाण केली. अखेर नागरिक या वादात पडले आणि आरोपी असलेल्या दोघांना मारहाण केली. यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांची गाडी झाडाला धडकली आणि नागरिकांनी आरोपी दोघांना पोलिसांच्या हवाली केले.