एक्स्प्लोर

Mumbai : फसवणूक प्रकरणी पाच बांधकाम व्यावसायिकांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई 

Mumbai Police  : मुंबईतल्या पाच बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. पाच विकासकांना मुंबईतल्या तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

Mumbai Police  : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केलेल्या मोठ्या कारवाईत मुंबईतल्या पाच बांधकाम व्यावसायिकांना (Mumbai Police action against 5 Builder) अटक करण्यात आली आहे. पाच विकासकांना मुंबईतल्या तीन वेगवेगळ्या फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मंगेश सावंत, जयेश रामी, जयेश शाह, अश्विन मिस्त्री आणि राजेश सावला अशी या बांधकाम व्यावसायिकांची नावं आहेत. लोकांकडून फ्लॅटसाठीची रक्कम घेऊनही त्यांना फ्लॅट न दिल्याच्या आरोपाखाली या पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

पहिल्या FIRमधील प्रकरणात अटक केलेल्या जयेश शाहविरुद्ध मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला. शाहवर आरोप आहे की, पैसे घेऊनही जवळपास 100 लोकांना घरं दिली नाहीत. शाह विरुद्ध फसवणुकीचे 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

दुसऱ्या FIRमधील आरोपी राजेश सावला, अश्विन मिस्त्री, जयेश रामी या तिघांविरुद्ध 23 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी 65 वर्षीय अनिल हळदनकर नावाच्या व्यक्तीला एक फ्लॅट 76 लाखांना विकला होता. मात्र अनिल हळदनकर यांना नंतर माहिती मिळाली की तोच फ्लॅट आधीच कुणाला तरी विकलेला आहे. राजेश सावला, अश्विन मिस्त्री, जयेश रामी या तिघांविरोधात याच प्रकारचे फसवणुकीचे एकूण 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

तिसऱ्या FIR मधील आरोपी मंगेश सावंतलाही अटक केली आहे. सावंत विरोधात 23 मे 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावंतनं रमाकांत जाधव नावाच्या व्यक्तिकडून बिल्डिंग बांधण्यासाठीच्या एका कामात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली 15 कोटी रुपए घेतली आणि काम पूर्ण केलं नाही. या फसवणुकी प्रकरणी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केलं आहे.  

या पाचही बिल्डरांना ग्राहकांची फसवणूक करण्याच्या आरोपाखाली अटक केलं आहे. अशा प्रकारे एकाच वेळी पाच व्यवसायिकांवर अशा प्रकारे कारवाई केल्याने बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget