एक्स्प्लोर

Sachin Vaze : सचिन वाझेचा कारागृहातील मुक्काम वाढला; जामीन अर्जावर स्थगिती, पुढची सुनावणी 7 ऑक्टोबरला

Sachin Vaze : सचिन वाझेच्या जामीन अर्जावर स्थगिती दिली असून पुढची सुनावनी ७ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. आता वाझेचा कारागृहात मुक्काम वाढला आहे.

मुंबई: देशातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mumbai) यांच्या अँटिलिया घराबाहेर ठेवलेल्या स्फोटक प्रकरणी माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली. न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने सचिन वाझेच्या जामीन अर्जावरील सुनावणी स्थगित केली असून पुढील सुनावणी ७ ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे सचिन वाझेचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. सुनावणीदरम्यान एनआयएच्या (NIA) वतीने ॲड. अनिल सिंग यांनी बाजू मांडली. "सचिन वाजे याच्यावर गंभीर स्वरूपाचे दहशतवादी कृत्य आणि हत्येचे गंभीर आरोप आहेत," असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. तसेच, ज्या अँटिलिया इमारतीबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्यात आली होती, त्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेशी संबंधित ३ सुरक्षा अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असल्याचेही एनआयएतर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.

सचिन वाझेंच्या जामिनाविरोधात NIAची धावपळ सुरू आहे. सचिन वाझेंच्या जामिनाविरोधात NIAने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. विशेष NIA न्यायालयाने दिलेल्या जामीन आदेशाला स्थगिती देण्याची मागणी NIAने केली. याचिकेवर सुरुवातीला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर सुनावणी अपेक्षित होती; मात्र त्यांनी प्रकरणातून स्वतःला बाजूला करत सुनावणीस नकार दिला. त्यानंतर प्रकरण न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ठेवण्यात आले. मात्र न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांच्या खंडपीठानेही सुनावणीस असमर्थता दर्शवली. न्यायमूर्ती आशिष चव्हाण यांनी यापूर्वी CBIचे वकील म्हणून काम केले होते, तर न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी वाझेंशी संबंधित इतर प्रकरणांत सुनावणी केली होती. त्यामुळे NIAने प्रकरण तातडीने मुख्य न्यायमूर्तींसमोर मांडले. मुख्य न्यायमूर्तींच्या आदेशानुसार प्रकरण न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती निला गोखले यांच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले. सुनावणीदरम्यान सचिन वाझेंच्यावतीने कोणताही वकील उपस्थित नव्हता. त्यानंतर हायकोर्टाने सचिन वाझेंच्या जामीन आदेशाला 7 ऑक्टोबरपर्यंत अंतरिम स्थगिती दिली. या आदेशाची तात्काळ माहिती कारागृह प्रशासनाला देण्यात आली असून, तोपर्यंत वाझेंना जामिनावर सोडण्यास मनाई करण्यात आली.

Sachin Vaze : सचिन वाझेसह 10 जणांवर आरोप निश्चित

दरम्यान, 25 फेब्रुवारी 2021 रोजी दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर एक संशयित बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र सापडले होते, ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. 'अँटिलिया' निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आणि उद्योगपती मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या बहुचर्चित प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासह एकूण 10 आरोपींविरोधात अखेर 5 वर्षांनंतर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मुंबईतील विशेष एनआयए (NIA) न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. त्यानंतर, आता सचिन वाझेला जामीन मंजूर करण्यात आला. 

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
Jalgaon Boat Accident: जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
जळगाव जिल्ह्यातील गोगडी धरणात बोट मध्यभागी आली अन् तोल जाऊन उलटली; चालकासह तिघा भावंडांचा तासभर मृत्यूशी संघर्ष, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी टळली
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar : मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
मोठी बातमी : देवेंद्र फडणवीसांना पुण्याचे पालकमंत्री केलं तर आणखी वाटोळं होईल, रोहित पवारांचा घणाघात
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
होय, तब्बल 121 किलो सोनं, भक्ताचं तिरुपती बालाजी चरणी मोठं दान अर्पण; थेट मुख्यमंत्री चंद्राबाबूही आले स्वागताला
CP On Mandar Kiwale Case: मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
मंदार किवळेला संपवण्यासाठी मास्टर प्लॅन, शस्त्र कुठून घेतली, कट कसा रचला, पोलिस आयुक्त अमितेश कुमारांनी दिली A टू Z माहिती
Sharad Pawar Health: शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
शरद पवार ब्रीच कैंडी रुग्णालयात दाखल, प्रफुल पटेल पुन्हा भेटीला; रोहित पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
पुण्यातील गोळीबार, मारहाणप्रकरणी सुनावणी; आरोपींना 6 दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात दोन्ही वकिलांचा युक्तिवाद
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
मुख्यमंत्री होऊन पुढच्या वर्षी आषाढीला पंढरपुरात पूजा करावी; ज्योती वाघमारेंकडून पुन्हा एकनाथ शिंदेंच्या CM पदाचं वक्तव्य
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget