मुंबई : गेल्या काही महिन्यांत ड्रग्सप्रकरणी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून अनेक ठिकाणी कारवाई केली जात आहे. तर, गेल्याच आठवड्यात सांगली जिल्ह्यातही पोलिसांनी एका ठिकाणी सुरू असलेल्या ड्रग्ज निर्मित्तीचा कारखानाच उध्वस्त करत तीन जणांना अटक केली होती. तर, पुण्यातील ड्रग्सप्रकरणही चांगले गाजले होते. आता, मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Mumbai NCP) मोठी कारवाई केली असून 200 कोटींच्या किंमतीचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 11.5 किलो उच्च गुणवत्तेचं कोकीन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक, 200 पॅकेट (5.5 किलोग्राम) जांगा जब्त केला आहे. याप्रकरणी, मुंबई (Mumbai) पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना अटक केली आहे
याप्रकरणी पोलीस सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एनसीबीने 11.5 किलो ग्रॅम उच्च श्रेणीचे कोकीन, 4.9 किलो हायब्रीड स्ट्रेन हाइड्रोपोनिक, 200 पॅकेट (5.5 किलोग्राम) जांगा जब्त केला आहे. याप्रकरणी, मुंबई पोलिसांनी आत्तापर्यंत 4 जणांना अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी मुंबई स्थित एक आंतरराष्ट्रीय कुरियर एजेंन्सीवर प्राथमिक कारवाई करत ड्रग्ज हस्तगत केले होते. या एजन्सीकडून एक पार्सल आस्ट्रेलियात पाठविण्यात आले होते, त्यानंतर नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात ड्रग्सचा साठा लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
भारतातील एका व्यक्तीद्वारे हे ड्रग्सचे सिंडीकेट चालवण्यात येत आहे. विदेशात राहणाऱ्या लोकांचा एक समुह सक्रीय असून अमेरिकेतून मुंबई आणि भारतातील अनेक राज्यात तसेच विदेशांतही कुरिअरद्वारे ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. याप्रकरणी, एक आरोपी नाव बदलून राहात असून ड्रग्ज व अम्लपदार्थांच्या तस्करीसाठी होणारा संवाद हा एका विशिष्ट कोडवर्डमधून केला जात आहे. याप्रकरणी, आत्तापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, या ड्रग्स रॅकेटप्रकरणी देश व विदेशातील व्यक्तींचा तपास मुंबई एनसीबीकडून केला जात आहे.
हेही वाचा
आत्महत्येवरील चर्चांनी कुटुंबीयांना दु:ख, पण शिरीष महाराजांनी संत तुकाराम महाराजांची परंपरा जपली