Magh Purnima 2025 : हिंदू धर्मग्रंथांनुसार, माघी पौर्णिमेचं फार महत्त्व आहे. माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा देखील म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं, दान करणं फार शुभ मानलं जातं. असं म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच, अशी मान्यता आहे की, या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तसेच, देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.
माघ पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 2025
हिंदू पंचांगानुसार, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होणार आहे. तसेच, पंचांगानुसार, या दिवशी चंद्रोदय संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांनी सुरु होणार आहे. या दिवशी स्नान-दानाचं विशेष महत्त्व आहे.
का आहे माघ पौर्णिमा विशेष?
माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार घेतला. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीच्या आराधना केल्याने सुख-समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो.
गंगा स्नानाचे महत्त्व
हिंदू धर्म ग्रंथांमध्ये सांगितले आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात यामुळेच माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्थान केल्यास पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीची ही पूजा केली जाते.
दान करण्याचे महत्त्व
गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: