Mumbai Naigaon two child : आपल्याच प्रेयसीची हत्या करुन, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणा-या आरोपीला आणि त्याला साथ देणा-या पत्नीला वसई न्यायालयानं १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघे पती पत्नी पोलीस कोठ़डीत असले तरी त्यांची दोन मुले ही सध्या पोलीस स्थानकातच वास्तव करत आहेत. आपण या पोलीस ठाण्यात का आहोत, आपले मम्मी पप्पा लॉक अपमध्ये का आहेत... याबाबत अनभिज्ञ असलेले ही दोन निरागस मुले पोलीस ठाण्यालाच आपलं घर समजत आहेत.  पोलीस मामा आणि पोलीस मावशी ही त्यांची योग्य काळजी घेत आहेत. खाकीच्या आतील बापमाणूस ही यातून समोर येत आहे. 


नायगाव पोलीस ठाण्यात आणि वसई पोलीस ठाण्यात सध्या ही दोन मुलं पोलिसांचा विरुगुंळा झाली आहेत. कुणी पोलीस मामा त्यांना चॉकलेट देतोय तर कुणी पोलीस मावशी त्यांना खाऊ, तर कोण त्यांच्या जेवणांची, त्यांच्या आंघोळीची, कपड्यांची देखभाल सध्या करताना दिसत आहे. आता ही मुलं का आहेत पोलीस ठाण्यात, मिसिंग आहेत का... तर असं काही नाही. वडिलांच्या चुकीची शिक्षा सध्या त्यांना मिळत आहे. 


दिनांक १४ ऑगस्ट पासून बेपत्ता असलेल्या नयना महत हिची हत्या झाल्याचा उलघडा नायगाव पोलिसांनी मंगळवारी १२ सप्टेंबर रोजी केला. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हेअर ड्रेसर म्हणून काम करणारी मयत नयना महत ही तरुणी आणि कलाकारांना ड्रेस घालणारा आरोपी मनोहर शुक्ला या दोघांचं प्रेमसंबध होतं. माञ मनोहर ने नयना ला डावलून २०१८ साली पौर्णिमेशी लग्न केलं. त्यानंतर पौर्णिमपासून मनोहरला दोन मुलं झाली एक चार वर्षाचा मुलगा तर दुसरी मुलगी दीड वर्षाची आहे. नयना मनोहरला आपल्याशी लग्न करण्याचा तगादा लावत होती. त्यामुळे दोघांमध्ये भांडण होत होती. दिनांक ९ ऑगस्ट २०२३ ला ही दोघांमध्ये भांडण झाली आणि मनोहरने नयनाला पाण्याच्या बादलीत बुडवून ठार मारलं. त्याच राञी नयनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने नयनाच्या घरातील सुटकेसमध्ये नयनाचा मृतदेह टाकून,  बाईकवर आपल्या पत्नी आणि लहानग्या मुलींना घेवून, १५० किमी दूर गुजरातच्या वलसाड येथून टाकून दिलं. 


मंगळवारी वसई न्यायालयात आरोपी पती पत्नीला हजर केलं असता, त्यांना वसई न्यायालयान १६ सप्टेंबर पर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.  पत्नी पोर्णिमेच्या घरातून किंवा मनोहरच्या घरातून त्या दोघा लहानग्याचा ताबा घेण्यासाठी कुणी आलं नाही. त्यामुळे ती दोन मुले, सध्या नायगाव पोलीस ठाणे तर वसई पोलीस ठाण्यातच आई बरोबर वास्तव करत आहेत. मुलं सात वर्षाच्या खालील असल्याने ती आई पासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे ती आई जवळच राहतात. आईला पोलीस कोठडी मिळाली असल्याने ती निरागस मुलं आता पोलीस ठाण्यालाच आपलं घर मानत आहे. पोलीस मामा आणि पोलीस मावशीना ही त्या दोघांचा लळा लागला आहे. दोघांसाठी पोलीस खाऊ, चॉकलेट आणून देत आहेत. खाकीतील आपण कटोर माणूस बघितला असेल, माञ त्या खाकीच्या आत ही एक बापमाणूस लपलेला आहे हे यातून जाणवत आहे.