Mira Road Crime Case: मिरारोड  (Mira Road Crime) हत्याकांड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मृत महिलेनं आत्महत्या केल्याचा दावा आरोपीनं केला आहे. हत्येचा आरोप आपल्यावर येऊ नये यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावली, असंही आरोपीचं वक्तव्य असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच, मृत महिला सरस्वती आपल्याला मामा म्हणायची असा दावाही आरोपीनं केला आहे. अशातच सरस्वती अहमदनगरमध्ये लहानाची मोठी झाल्याची माहिती मिळत आहे. या हत्या प्रकरणातील मृत महिला सरस्वती वैद्य हिचा अहमदनगरशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. 


कोण होती मिरारोड प्रकरणातील सरस्वती? 


सरस्वती वैद्य ही अनाथ होती. अहमदनगरमध्ये तिनं आपलं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. अहमदनगरमधील जानकीबाई आपटे बालिकाश्रम या संस्थेत याआधी सरस्वती राहत होती. त्यानंतर मात्र ती नोकरी शोधण्यासाठी मुंबईला आली आणि मुंबईतच  तिला तिचा मामा भेटला, अशी माहिती जानकीबाई आपटे बालिकाश्रम संस्थेनं दिली आहे. तसेच, कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी तिला संस्थेच्या दाखल्याची गरज होती, मात्र संस्थेकडून दाखल देण्यात आला नाही. त्यावेळी सरस्वतीनं संस्थेवर पाच ते सहा वेळी केसही दाखल केली होती. 


माझा मामा मुंबईत आहे आणि त्यांनी मला ओळखलं असून मला त्याच्याकडे जायचं आहे, असं सांगून सरस्वती मुंबईला निघून गेली होती. त्यानंतर माझ्या मामाकडे कपड्याच्या मोठमोठ्या गिरण्यात आहे. मी मुंबईत त्याच्यासोबत खूप आनंदी आहे, असं सरस्वतीनं दाखल्यासाठी अहमदनगरला परतल्यावर संस्थेत सांगितलं होतं. मात्र दोन वर्षांपूर्वी ती पुन्हा संस्थेत आली होती, तेव्हा तिची तब्येत अत्यंत खराब झालेली. तिच्या सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर तिला संस्थेतील संस्थाचालकांनी कर्मचाऱ्यांनी विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र तिनं काहीही माहिती दिली नाही. अशातच सरस्वतीच्या मृत्यूची बाबा संस्थेला कळाल्यावर सर्वांना धक्का बसला. सरस्वतीच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जानकीबाई आपटे अनाथ बालिकाश्रम संस्थेच्या कर्मचारी अनु साळवे यांनी केली आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


मृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या बुधवारी रात्री मिरारोडमध्ये घडली. मिरारोडच्या घटनेचा खुलासा झाल्यानंतर अवघा देश हादरला. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे सत्र न्यायालयानं आरोपीला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. 


आरोपी मनोज सानेनं पोलिसांना सांगितलं की, तो HIV पॉझिटिव्ह आहे, त्यामुळेच त्याच्यात आणि सरस्वतीच्या नात्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. आरोपी मनोजच्या चौकशीतून समोर आलेल्या काही गोष्टींनंतर मिरारोड पोलिसांनीही याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, मनोजनं चौकशीत अनेक दावे केले आहेत. तो सध्या हत्येच्या आरोपांखाली अटकेत आहे, तो दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, तो चौकशीत सहकार्यही करत नाही. आरोपी सतत आपला जबाब बदलत आहे. त्यामुळे त्याच्या चौकशीतून समोर आलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपास केला जाणार आहे. तसेच, मनोजनं केलेल्या सर्व दाव्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. मनोजचा मेडिकल रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच याप्रकरणातील अनेक गोष्टी स्पष्ट होतील असंही पोलीस म्हणाले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :