मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यशस्वी मॉडल ते स्पर्धा परीक्षेतील टॉपर असणाऱ्या तरुणीसोबत एक असा प्रकार घडला आहे ज्यामुळे तिच्या पाया खालची जमिनच सरकली आहे. नुकतच युपीएससी या स्पर्धा परीक्षेत देशात 93व्या क्रमांकावर आलेली ऐश्वर्या श्योराण या तरुणीसोबत हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर तिचे तब्बल 16 बनावट अकाऊंट बनवण्यात आल्याचे तिला तिच्या नातेवाईकांकडून कळाले आणि तिने तात्काळ याची माहिती मुंबई पोलिसांना दिली आहे.


मॉडेल ऐश्वर्या श्योराण, माजी मिस इंडिया, फायनालिस्ट मिस इंडिया आणि सैन्य दलातील एका कर्नलची मुलगी ते युपीएससी टॉपर आणि आता IAS अधिकारी असलेली तरुणी ही तरुणी एकाकी प्रकाश झोतात आली. चहू बाजूंनी तिझ्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. पण हे सर्व सुरु असताना या सर्व आनंदवार विरजन पडेल अशी एक घटना ऐश्वर्या सोबत घडली. ज्यामुळे ऐश्वर्याचा आनंद क्षण भंगूर ठरला. ऐश्वर्याच्या सोशल मिडियावरील अकाऊंटवर हजारो नेटकऱ्यांनी तिला अभिनंदनाचे मेसेज केले. त्यात तिझे जवळचे आणि नातेवाईक देखील होते. पण ऐश्वर्या त्या मेसेजवर काहीच रिप्लाय करत नाही म्हणून तिच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तिला फोन केला. त्यानंतर ऐश्वर्याची अनेक बनावट अकाऊंट सोशल मीडियावर तयार करण्यात आल्याचं उघड करण्यात आलं.


आपली बनावट सोशल मिडाया अकाऊंट बनवून त्यावर तिच्या नावाने पोस्ट केल्या जात आहेत. याबाबत तिनं लगेच मुंबई पोलिसांना कळवलं. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या बनावट सोशल मिडिया खात्यांबाबत ते आता चौकशी करत आहेत. मात्र अशी बनावट खाती का आणि कशी बनवली जातात? ते ही माहिती करुन घेणं गरजेचं आहे.


मुंबई पोलिसांची क्राईम ब्रान्च एका मोठ्या बनावट सोशल मिडाया फॉलोअर्स प्रकरणाचा तपास करत आहे. ज्यात बादशाह सारख्या जगप्रसिद्ध गायकासह अनेक बॉलिवूड आणि विविध क्षेत्रांतील मोठ्या मोठ्या लोकांची चौकशी मुंबई क्राईम ब्रांचने केली आहे. त्यात आता हे IAS अधिकारी ऐश्वर्या श्योराण यांच्या प्रकरणाची भर पडली आहे.


रॅपर बादशाहाची सुद्धा सलग तीन दिवस मुंबई क्राइम ब्रांचच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये बादशहाने आपल्या पागल व्हिडिओवर लाईक्स वाढवण्यासाठी एका कंपनीला 72 लाख रुपये दिल्याचं स्पष्ट झालं. मात्र बादशहाने सर्विस टॅक्ससुद्धा भरल्याचा सांगितलं. आतापर्यंत फेक फॉलोवर्स प्रकरणी क्राईम ब्रांचकडून काही सेलिब्रेटींची चौकशी करण्यात आली आहे. सध्या अशा फेक फॉलोअर्स आणि बनावट खात्यांची रोज नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे सोशल मिडियाचा गैरवापर वाढल्याचे समोर आले आहे.


महत्त्वाच्या बातम्या : 


कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या बँक खात्यांवर सायबर चोरांचा डोळा


गृहमंत्र्यांच्या नागपुरात चोरीचं सत्र सुरुच; पोलीस बंदोबस्त असतानाही कोरोनामुळे सील केलेल्या घरात चोरी

पोलिसाच्या घरी चोरी, तक्रारीनंतर पोलिस म्हणतात, 'ते' घर सॅनिटाईझ नसल्यानं तपासाला जाणार नाही!