सहसा नेटिझन्स सोशलमीडियावर व्यक्त होतात, आवडीच्या गोष्टी शेयर करताना दिसतात तर ट्रोलिंग ही करतात, यापलीकडे काही युट्युब व्हिडीओ ना लाईक डिसलाईक सोबत कॉमेंट बॉक्स असतो तर अश्याच एका 'स्ले Point' या युट्युब चॅनेल ने 'Why Indian Comments Section Is Garbage' असा रोस्टिंग प्रकारातील एक व्हिडिओ तीन आठवड्या पूर्वी केला.
या व्हिडीओ मधून रोस्टिंग केलं की भारतीय लोग कश्या कॉमेंट्स करतात आणि हा हा म्हणता म्हणता तो व्हायरल झाला आणि तब्बल 5.6M+ लोकांनी आवडीने तो पाहिला तर 87 हजार कॉमेंट्स आल्या असं काय होतं या रोस्ट व्हिडीओ मध्ये तर...
हा व्हिडीओ मुळात केला गेला तो भारतीय नेटिझन्स कॉमेंट्स कश्या करतात यावर रोस्टिंग केलं.
तुम्ही देखील अश्या अर्थहीन विचित्र कॉमेंट्स तुमच्या फोटोला किंवा मोठ्या चॅनेलच्या व्हिडीओ वर येताना पाहतात, या कॉमेंट बॉक्स मध्ये बिजनेस मार्केटिंग ते ट्रोलिंग/चॅटिंग भांडणं सुद्धा लागलेली पाहतो!
सर्वात आधी कॉमेंट जो करतो त्यालाही व्हिडीओ पेक्षा जास्त लाईक्स मिळालेलs पाहिले असतील, तर काहींचा छंद हा फक्त कॉमेंट करणे इथवर येऊन थांबला यातील काही लाईव्ह TV वर सुद्धा चॅट बॉक्स मध्ये धमाल उडवून देणाऱ्या कॉमेमट्स करताना दिसतात.
अश्यातल्या निवडक मंडळींच्या कॉमेंट्स स्ले पॉईंट यांच्या या व्हिडीओ मधून समोर आल्या, यातीलच एक 'बिनोद थरू' नावाची व्यक्ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सोशल साईट वर कॉमेंट बॉक्स मध्ये नुसतं 'बिनोद' असं लिहते हे स्ले पॉईंटच्या लक्षात आलेलं आणि यावर केलेल्या रोस्टिंगमुळे हा 'बिनोद' अवघ्या भारतभर पसरला आणि हा हा म्हणता त्यावर लाखो मिम्स आणि सगळीकडे 'बिनोद' आणि फक्त बिनोदच... दिसत आहेत...
बिनोद थरूच्या या अनोख्या कॉमेंट स्टाईलची दखल नेटिझन्सने घेत त्याची चांगलीच टर उडवलेली दिसत आहे, म्हणूनच सगळीकडे तुम्हाला रिप्लाय किंवा कॉमेंट्स मध्ये 'BINOD' दिसेल त्याचे मिन्स दिसतील तर गोंधळून जाऊ नका.. यापुढेही तुम्ही या सगळ्या बिनोद सारखे आहात का की सभ्यतेने सोशीलमीडिया वर कॉमेंट करता हे आम्हाला सांगा...
विनोदाचा 'बिनोद'!
विनीत वैद्य
Updated at:
09 Aug 2020 11:09 PM (IST)
सोशल मीडियावर धुमाकोळ घातलाय तो या 'बिनोद' ने. ढीगभर मिम्स आणि कोणत्याही पोस्ट वर, युट्युबच्या कॉमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला ही हा 'बिनोद' दिसला असेल... हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूया...
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -